प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. लवकरच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या आयुष्यात बाळाचे आगमन होणार आहे. दीपिका पादुकोण ही प्रेग्नंट असताना देखील आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतंय. दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण ही सध्या बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोणचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसतात. कायमच दीपिकाच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळताना देखील दिसते. दीपिका पादुकोणची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते.
दीपिका पादुकोण ही आता लंडनमध्ये चांगला वेळ घालवताना दिसतंय. दीपिका पादुकोण ही पती रणवीर सिंह याच्यासोबत लंडनला पोहचलीये. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
दीपिका पादुकोण हिने पती रणवीर सिंहचा हात पकडला असून ती चालताना दिसतंय. हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. विशेष म्हणजे यावेळी जबरदस्त अशा लूकमध्येही दीपिका पादुकोण दिसत आहे. दीपिका पादुकोण हिच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. चाहत्यांना हा व्हिडीओ आवडलाय.
या व्हिडीओनंतर चाहते एक प्रश्न विचारताना दिसत आहेत. दीपिका पादुकोणचा हा लंडनमधील व्हिडीओ पाहून अनेकांनी म्हटले आहे की, अनुष्का शर्मा हिच्याप्रमाणेच दीपिका पादुकोण ही देखील आपल्या बाळाला लंडनमध्येच जन्म देणार आहे का? डिलीवरीला अवघे काही दिवसच शिल्लक असताना दीपिका पादुकोण ही लंडनला गेल्याने अनेकांना वाटत आहे की, दीपिका पादुकोण ही बाळाला जन्म लंडनमध्येच देईल.
मात्र, यावर दीपिका पादुकोण किंवा रणवीर सिंह यांच्यापैकी कोणीही काहीही भाष्य अजूनही केली नाहीये. दीपिका पादुकोणचा कल्कि 2898 AD हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाचे प्रमोशन करताना दीपिका दिसली होती. अनुष्का शर्मा हिने देखील काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिलाय. अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय.