बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. काजोल हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. विशेष म्हणजे काजोल ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना काजोल दिसते. सध्या काजोल हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. काजोल दुर्गापूजेमध्ये व्यस्त आहे. हेच नाही तर मुंबईमध्ये काजोल हिने स्वतःचा एक पंडाल उभारला. यावेळी देवीच्या दर्शनासाठी अनेक मोठे कलाकार पोहेचले होते.
जया बच्चन या देवीच्या दर्शनासाठी काही दिवसांपूर्वीच पोहोचल्या. यावेळी मंडपामध्ये काही भाविक शिट्टी वाजवताना दिसले. यावेळी काजोल हिचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळाले. शिट्टी वाजवण्याची ही जागा आहे का? असा थेट प्रश्न विचारताना काजोल ही दिसली. अजय देवगण देखील पूजेसाठी पोहोचला होता.
सध्या काजोल हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ मंडपातीलच आहे. पायऱ्या उतरत असताना काजोल हिचा पाय घसरतो आणि थेट ती पडत असताना तिची बहीण तिला सांभाळते. यावेळी काजोल हिच्या हातामध्ये फोन होता आणि तो फोन सरळ खाली पडताना दिसतोय.
आता काजोल हिचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये काजोल ही चांगलीच घाबरलेली दिसत आहे. काजोल हिच्या व्हिडीओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी व्यवस्थित चालण्याचा सल्ला काजोल हिला दिल्याचे बघायला मिळतंय. फोन जाऊद्या तुम्ही नाही पडल्या हे महत्वाचे असल्याने एकाने म्हटले.
साडीमुळेच काजोल ही पडणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. काजोल ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच काजोल हिने आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना घरी जेवणासाठी बोलावले. याचेही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. काजोल ही अत्यंत मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.