सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत सिव्हील मॅरेज केले. 23 जूनला दुपारी सिव्हील मॅरेज झाले. यावेळी सोनाक्षी सिन्हाने सही करताना वडिलांचा हात पकडल्याचे बघायला मिळाले. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हे मॅरेज झाले. त्यानंतर सायंकाळी एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला बॉलिवूडचे कलाकार आणि जवळचे मित्र होते. आता या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आपल्या लग्नात सोनाक्षी सिन्हा ही धमाल करताना दिसत आहे. हेच नाही तर पापाराझीसोबत खास फोटोही सोनाक्षी आणि झहीरने काढले.
सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सिव्हील मॅरेजसाठी जाताना सोनाक्षी सिन्हा फुलांची चादर घेऊन आली. मात्र, यावेळी सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ गायब असल्याचे बघायला मिळाले. मुळात म्हणजे ज्यावेळी नवरी फुलांची चादर घेऊन येते, त्यावेळी चारही बाजूंनी तिचे भाऊ चादर पकडतात.
यावेळी अभिनेता साकिब सलीम हा भावाचे कर्तव्य पार पाडताना दिसला. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात भाऊ लव आणि कुश हे सहभागी झाले. मात्र, ते लग्नाच्या कोणत्याही उत्सवात दिसले नाहीत. लव आणि कुशचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, बहिणीच्या आनंदात ते सहभागी झाले नाहीत.
लव आणि कुश हे सोनाक्षीच्या लग्नात नाराजच दिसले. हेच नाही तर लग्नाच्या अगोदरच्या कोणत्याही कार्यक्रमात लव आणि कुश हे सहभागी झाले नव्हते. फक्त लव आणि कुशच नाही तर सिन्हा कुटुंबातील अनेक सदस्य हे या लग्नात नाराज दिसले. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, शत्रुघ्न सिन्हा यांनी या लग्नाला विरोध केलाय. मात्र, त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केले की, सोनाक्षीचा निर्णय कोणताही असो तिच्या निर्णयात मी तिच्यासोबतच असणार आहे. अखेर काल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न झाले आहे.