प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही कायमच चर्चेत असते. तापसी पन्नूचा काही दिवसांपूर्वीच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे तापसी पन्नूच्या या चित्रपटाने धमाका केला. डंकी चित्रपटात तापसी पन्नू ही शाहरूख खान याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली. तापसी पन्नूचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. तापसी पन्नूने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. तापसी पन्नू ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. तापसी पन्नू कायमच सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
आता सध्या तापसी पन्नूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. तापसी पन्नूचा हा व्हिडीओ पाहून लोकांना थेट जया बच्चन यांचीच आठवण आलीये. तापसी पन्नूला लोकांनी थेट जया बच्चनच म्हटले आहे. हेच नाही तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर तापसी पन्नूला सोशल मीडियावर जोरदार खडेबोल सुनावले जात आहेत.
तापसी पन्नू ही बहीण शगुन पांडे हिचा चित्रपट पाहण्यासाठी पोहचली होती. चित्रपट पाहून तापसी पन्नू बाहेर येत असताना पापाराझी आणि काही चाहत्यांनी तिच्या भोवती गर्दी केली. मात्र, यावेळी तापसी पन्नू ही प्रचंड रागात दिसली. तिने पापाराझी यांना देखील फोटो घेण्यासाठी पोज दिल्या नाहीत. शिवाय तेथून ती निघून जाताना दिसली.
पुढे एक मुलगी तापसी पन्नू हिच्यासोबत फोटो घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, या मुलीला देखील फोटो तापसी पन्नू घेऊ देत नाही. तू खूप जवळ येत आहे.. दूर राहा..असे म्हणताना तापसी पन्नू ही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पुढे तापसी पन्नू ही रागारागात गाडीमध्ये बसताना देखील दिसत आहे. हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.
लोकांना तापसी पन्नूचे हे वागणे अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तापसी पन्नूला लोक खडेबोल सुनावताना दिसत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, इतके काय आहे हिचे? चाहत्यांसोबत असे वागतात, म्हणून दिवसेंदिवस बॉलिवूड कलाकारांची किंमत कमी होत आहे. तिसऱ्याने लिहिले की, हे वागणे खरोखरच चुकीचे आहे.