हार्दिक पांड्या हा सध्या त्याच्या क्रिकेटपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलाय. हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात वादळ आल्याचे सांगितले जातंय. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा हे विभक्त झाल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर हार्दिक पांड्याचे घर नताशा हिने सोडले आहे. नताशा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. नताशा हिच्या या पोस्टनंतर लोक हैराण झाले. नताशा हिने थेट म्हटले होते की, लवकरच एकजण रस्त्यावर येणार आहे. नताशा हिने हे हार्दिक पांड्या याच्याबद्दलच बोलल्याचे सांगितले जाते. घटस्फोटाची चर्चा असतानाच नताशा ही मुंबईतील बांद्रा परिसरात स्पॉट झाली.
हार्दिक पांड्याला डेट करण्याच्या अगोदर नताशा ही अली गोनी याला डेट करत होती. हेच नाही तर हे एका शोमध्येही सहभागी झाले होते. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आता नताशा आणि अली गोनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये नताशा हिच्याकडून मोठा खुलासा केला जातोय.
या व्हिडीओमध्ये फक्त नताशा हीच नाही तर अली गोनी हा देखील दिसतोय. या व्हिडीओमध्ये अली गोनी याच्यासोबत ब्रेकअप होऊनही त्याला भेटत असल्याचे सांगताना नताशा दिसत आहे. हा व्हिडीओ तसा नताशाचा जुना आहे. म्हणजे ब्रेकअपनंतरही एक्सला नताशा भेटते. आता हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. हेच नाही तर अनेकांनी थेट म्हटले की, लग्नानंतरही ही एक्सला भेटत असेल.
Even after marriage with Hardik Pandya, Natasha stankovic meets her ex-boyfriend Aly Goni.
Never trust foreign women. 😏 pic.twitter.com/oAFc7hmeqw
— Radhika Chaudhary (@Radhika8057) May 25, 2024
ब्रेकअपनंतरही एक्सला भेटण्याच्या सवयीमुळेच हार्दिक पांड्या हिच्यासोबत घटस्फोट घेत असेल असेही काही लोकांनी म्हटले आहे. घटस्फोटाच्या चर्चांवर अजूनही हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी भाष्य केले नाहीये. मात्र, रिपोर्टनुसार दोघांमधील वाद हा टोकाला गेलाय. हार्दिक पांड्या आणि नताशा यांना एक मुलगा देखील आहे. नताशा हिने सोशल मीडियावरून पांड्या हे नाव काढून टाकले आहे.
हार्दिक पांड्या याचा देखील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या हा स्पष्ट सांगताना दिसतोय की, माझी संपत्ती फक्त 50 टक्केच माझ्या नावावर आहे. बाकी माझी सर्व संपत्ती ही माझ्या आईच्या नावावर आहे. हेच नाही तर गाड्या घर सर्व माझ्या वडिलांच्या आणि भावाच्या नावावर आहे. म्हणजे हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेऊन फार काही पैसा नताशा हिला मिळणार नाहीये.