हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा ‘हा’ व्हिडीओ तूफान व्हायरल, घटस्फोटाच्या काही मिनिटांनी…

| Updated on: Jul 19, 2024 | 1:53 PM

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हार्दिक पांड्याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सातत्याने सांगितले जाते. हार्दिक पांड्या आणि त्याच्या पत्नीने रात्री एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही विभक्त होत आहोत.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल, घटस्फोटाच्या काही मिनिटांनी...
Hardik Pandya and Natasha
Follow us on

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या. दोघांमध्ये वाद असल्याचे सांगितले गेले. शेवटी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या घटस्फोटाची घोषणा केली. लग्नाला चार वर्षे पूर्ण होताच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हेच नाहीतर नताशा ही आता भारत सोडूनही गेलीये. नताशा आणि हार्दिक पांड्या यांचा एक मुलगा असून त्याचे नाव अगस्त्य आहे. घटस्फोटानंतर नताशा हीच मुलाचा सांभाळ करणार आहे. हार्दिक पांड्या T20 वर्ल्डकप जिंकून आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी नताशा ही उपस्थित नव्हती.

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आणि सहमतीने आम्ही विभक्त होत असल्याचे सांगितले. हार्दिक आणि नताशा यांची पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. 2020 मध्ये केलेल्या कोर्ट मॅरेजनंतर त्यांनी उदयपूरमध्ये गेल्याच वर्षी दुसऱ्यांदा शानदार पद्धतीने रितीरिवाजांनुसार लग्न केले. विशेष म्हणजे यांच्या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

सध्या सोशल मीडियावर नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या लग्नातील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लग्नात हार्दिक पांड्याचे बूट चोरण्यात आले. हार्दिकची वहिनी पंखुरीने त्याचे बूट चोरले होते. वहिणीने त्याच्याकडे  1 लाख 1 रुपयांची मागणी केली होती.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हार्दिक पांड्या 5 लाख रुपये देणार असल्याचे म्हणतो. यावेळी हार्दिक आणि नताशा खूप जास्त आनंदी देखील दिसत आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 31 मे 2020 रोजी कोर्ट मॅरेज केले होते. लग्नाच्या काही दिवसांमध्ये नताशा हिने मुलाला जन्म दिला. 2023  मध्ये परत त्यांनी खास लग्न केले. दोघेही या लग्नात खूप जास्त खुश दिसत होते. त्याचा मुलगा अगस्त्य हा देखील लग्नात धमाल करताना दिसला. 

हार्दिक पांड्या याच्या प्रत्येक सामन्यात त्याला सपोर्ट करण्यासाठी नताशा ही स्टेडियमवर पोहोचत असत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती सामन्यात दिसत नव्हती. तेंव्हापासूनच या दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जात होते. काही दिवसांपूर्वीच नताशा हिने हार्दिक पांड्या याचे घर सोडले. काही दिवस डेट केल्यानंतर यांनी कोर्ट मॅरेज केले होते.