नीता अंबानी यांचे हे बोलणे ऐकून लग्नातील उपस्थित पाहुण्यांना अश्रू रोखणे झाले कठीण, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अखेर..

| Updated on: Jul 17, 2024 | 1:50 PM

Nita Ambani Video : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील विविध व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सर्वचजण धमाल करत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकारही मोठ्या संख्येने या लग्नात सहभागी झाले आहेत.

नीता अंबानी यांचे हे बोलणे ऐकून लग्नातील उपस्थित पाहुण्यांना अश्रू रोखणे झाले कठीण, तो व्हिडीओ व्हायरल, अखेर..
Nita Ambani
Follow us on

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै 2024 रोजी झाले. या लग्नाची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी प्री वेडिंग फंक्शन देखील ठेवण्यात आले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी फक्त देशच नाहीतर विदेशातूनही लोक मोठ्या संख्येने दाखल झाले. या लग्नामध्ये बॉलिवूड कलाकार आणि काही क्रिकेटर तर धमाल करताना दिसले. आता या लग्नातील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हेच नाहीतर अनंत अंबानी याने गिफ्ट म्हणून आपल्या लग्नात जवळच्या मित्रांना 2 कोटींचे घड्य़ाळ दिली आहेत.

आता नीता अंबानी यांचा अनंतच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. नीता अंबानी यांचे बोलणे एकून लग्नात उपस्थित सर्वच लोक आपले अश्रू लपवताना दिसत आहेत. नीता अंबानी या कन्यादानाचे महत्व सांगताना दिसत आहेत. नीता अंबानी यांच्या हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नीता अंबानी यांनी म्हटले की, मी आज खूप जास्त आनंदी आणि इमोशनल आहे. कारण माझ्या हृदयाचे दोन तुकडे राधिका आणि अनंत एक होत आहेत. हिंदू धर्मात लग्न म्हणजे एका आयुष्यासाठी नव्हे तर सात आयुष्य एकत्र राहण्याचे वचन आहे. प्रत्येकवेळी तुम्हाला हाच जोडीदार मिळेल, असा विश्वास आहे. लग्नात सर्वात महत्वाची विधी ही कन्यादान आहे. 

ज्यामध्ये वधूचे आई वडिल आपल्या मुलीला वराकडे सोपवतात. मी सुद्धा कोणाचीतरी मुलगी आहे, मी एका मुलीची आई आहे, एक सूनेची सासू आहे. कारण आई वडिलांसाठी मुली या आशिर्वाद असतात. त्या लक्ष्मीचे रूप असतात. आमच्या मुली घराचे स्वर्ग बनवतात. स्त्री पूजनीय आहे, ती जननी आणि अन्नपूर्णा आहे. ती सुख समृद्धि आणि ऐश्वर्य घेऊन येते. 

कन्यादान करणे कोणत्याही पालकांसाठी सोपे नाही. यावेळी नीता अंबानी या राधिकाच्या आई वडिलांकडे पाहून म्हणतात की, तुम्ही आम्हाला तुमची मुलगी देत नाही तर तुमच्या कुटुंबात मुलाचेही स्वागत करत आहात. आता नीता अंबानी यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट करतानाही दिसत आहेत.