ये ना चोलबे… थलाइवा रजनीकांत यांच्या ‘त्या’ कृत्यावर चाहते प्रचंड नाराज; ही वागणूक…

| Updated on: Mar 05, 2024 | 1:02 PM

Rajinikanth Video :अंबानींच्या पार्टीला जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार हे उपस्थित होते. आता पार्टीची लोकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. हेच नाही तर आता या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या पार्टीमध्ये रजनीकांत हे देखील सहभागी झाले होते.

ये ना चोलबे... थलाइवा रजनीकांत यांच्या त्या कृत्यावर चाहते प्रचंड नाराज; ही वागणूक...
Follow us on

मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग पार्टीचे आयोजन गुजरातमधील जामनगरमध्ये करण्यात आले. या पार्टीसाठी देशच नाही तर विदेशातूनही लोक मोठ्या प्रमाणात दाखल झाले. पाहुण्यांसाठी खास जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था ही करण्यात आली. तब्बल 2500 पदार्थ हे पाहुण्यांना वाढले गेले. तीन दिवस ही प्री वेडिंग पार्टी सुरू होती. या पार्टीला बाॅलिवूड कलाकारांची मांदीयाळी बघायला मिळाली. जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार हे या पार्टीसाठी उपस्थित होते. आता या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

सुपरस्टार रजनीकांत हे देखील या पार्टीत दाखल झाले. रजनीकांत हे पत्नी लता आणि मुलगीसोबत 3 मार्चला जामनगरमध्ये दाखल झाले. अंबानींच्या पार्टीत धमाल करताना रजनीकांत हे दिसले. सध्या रजनीकांत यांचा एक अंबानींच्या पार्टीतील व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक रजनीकांत यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

अंबानींच्या पार्टीतून आपल्या कुटुंबासोबत बाहेर निघताना रजनीकांत हे दिसत आहेत. यावेळी पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देताना रजनीकांत दिसत आहेत. मात्र, यादरम्यान असे काही घडले की, लोकांनी संताप व्यक्त केलाय. फक्त हेच नाही तर रजनीकांत यांच्या विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट ही बघायला मिळतंय.

अंबानींच्या पार्टीतून बाहेर पडत असतानाच पापाराझी हे रजनीकांत यांना फोटोसाठी पोज देण्यास सांगतात. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी आणि पत्नी देखील आहेत. यावेळीच त्यांची घर काम करणारी कर्मचारी महिला देखील मागे येते आणि तिथे दोन सेकंद थांबते. यानंतर थेट रजनीकांत हे त्या महिलेला तिथून दूर जाण्याचा इशारा करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, रजनीकांत हे कोणालातरी सांगून त्या महिलेला बाजूला करण्यास सांगत आहेत. हाच प्रकार आता लोकांना अजिबातच आवडला नसल्याचे बघायला मिळतंय. लोक संताप व्यक्त करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, हा खरोखरच चुकीचा प्रकार नक्कीच आहे. ती महिला देखील एक मनुष्यच आहेत, तिच्यासोबत जर एखादा फोटो आला असता तर काय समस्या होती?