रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी जोडी आहे. काही वर्ष एकमेकांना डेट करत यांनी अचानक लग्न केले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुलीचे नाव राहा असून तिचे फोटो व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांच्या नवीन घराचे बांधकाम पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वीच राहा हिला घेऊन पोहोचले होते. अत्यंत आलिशान असे घर कपूर कुटुंबियांचे मुंबईमध्ये बांधणे सुरू आहे. बांधकाम पाहण्यासाठी कायमच आलिया आणि रणबीर कपूर हे पोहोचतात.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहत्यांना कायमच आवडते. आता रणबीर कपूर आणि आलिया यांच्या घरात जेवणामध्ये दररोज काय पदार्थ असतात, याबद्दल मोठा खुलासा झालाय. याबद्दलचा एक व्हिडीओच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.
द प्रायव्हेट शेफ्स क्लबचे शेफ सूर्यांश सिंग कंवर यांनी आलिया आणि रणबीरसाठी काम केले आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितला आहे. रणबीर आणि आलियाच्या घरी दररोज कोणते पदार्थ बनवले जातात याचाही खुलासा करण्यात आलाय.
सूर्यांशने एक पोस्ट शेअर केलीये. त्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचेही फोटो दिसत आहेत. यासोबतच त्यांच्या घरात बनवलेल्या पदार्थांचे फोटोही शेअर करण्यात आले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घरात विविध पदार्थ जेवणात बनत असल्याचे बघायला मिळतंय. आता हीच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
चाहते हे या पोस्टवरच मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, खरोखरच असे आयुष्य पाहिजे राव…इतके सारे पदार्थ घरी तयार करून खाण्यास मिळतात. दुसऱ्याने लिहिले की, फोटोमध्ये दिसणारे सर्व पदार्थ चांगले दिसत आहेत. आता ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.