वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा

| Updated on: Mar 17, 2025 | 11:26 AM

Aamir khan on Salman Khan Love Life: आमिर खानने नव्या गर्लफ्रेंडची कबुली दिल्यानंतर सलमान खानही वयाच्या 59 व्या वर्षी चढणार बोहल्यावर, भाईजानच्या 'लव्ह लाईफ'बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खानच्या वक्तव्याची चर्चा...

वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या लव्ह लाईफबद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
Follow us on

Aamir khan on Salman Khan Love Life: वय हा फक्त एक आकडा आहे. वय वाढल्यानंतर देखील तुम्ही सर्व काही करू शकता, जे कमी वयोगटातील व्यक्ती करतात. असंच काही अभिनेता आमिर खान याने देखील केलं आहे. आमिर खान याने स्वतःच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबद्दल मोठी घोषणा केली आणि दोन घटस्फोट झाल्यानंतर नव्या रिलेशनशिपची कबुली दिली. वयाच्या 59 व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार आसल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. दरम्यान, आमिर खान याने अभिनेता सलमान खान याच्या लव्ह लाईफबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे.

सांगायचं झालं तर, नुकताच आमिर खानने चाहत्यांना त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली. किंग खान शाहरुख खानच्या पत्नीचं नाव देखील गौरी खान आहे. याच संबंधी आमिर खान याला खास मित्र सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला.

सलमान खान लवकरच 60 वर्षांचा होणार आहे. पण अभिनेता अद्यापही अविवाहित आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेनंतर एका पत्रकाराने आमिर खानला सलमानच्या लग्नाबद्दल विचारलं. ‘शाहरुख खान याच्याकडे एक गौरी आहे. तुझ्याकडे देखील एक गौरी आहे… आता सलमान देखील….’ यावर आमिर खान म्हणाला, ‘आता सलमान खान याला देखील गौरी भेटली पाहिजे…’

हे सुद्धा वाचा

कोण आहे गौरी स्प्रॅट?

आमिर खान याची नवीन गर्लफ्रेंड विवाहित असून तिचा घटस्फोट झाला आहे. रिपोर्टनुसार, गौरी हिला एक मुलगा देखील आहे. सध्या ती आपल्या मुलासह बेंगळुरूमध्ये राहते. गौरी एका प्रोडक्शन हाऊसमध्येही काम करते. अभिनेत्याने सांगितले होते की, तो गौरीला गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो. पण त्यांच्या रिलेशनशिपला फक्त 1 वर्ष झालं आहे.

आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने दोन लग्न केलीत. पण आमिर खान याचं एकही लग्न अधिक काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्याने दोन्ही पत्नींकडून घटस्फोट घेतला. आता अभिनेता गौरी हिला डेट करत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत.