मुंबई | 8 जानेवारी 2024 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान गेल्या काही दिवसांपासून लेकीच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आमिर खान याची मुलगी आयरा खान हिचं लग्न असल्यामुळे संपूर्ण खान कुटुंब उदयपूर याठिका आहे. सध्या आयरा हिच्या लग्नाआधीच्या विधी सुरु आहेत. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केलं. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. ज्यामुळे आयरा आणि नुपूर यांना ट्रोल देखील करण्यात आलं. आता उदयपूर येथे सुरु असलेल्या लग्न सोहळ्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
व्हिडीओमध्ये आमिर खान कुटुंबासोबत आनंद लुटताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आमिर खान दोन्ही पत्नींसोबत डान्स करताना दिसत आहे. आमिर खान याची पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव यांच्यासोबत अभिनेता लेकीच्या लग्नाचा आनंद लुटताना दिसत आहे. अभिनेता डान्स करत असताना मुलांना देखील बोलावतो. पण मुलं तेथून पळून जातात.
सोशल मीडियावर आमिर खान आणि त्याचा कुटुंबाचा व्हिडीओ गायिका आशू शर्मा यांनी पोस्ट केला आहे. ज्यामध्ये आशू शर्मा गाताना दिसत आहे आणि आमिर खान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा खान आणि नुपूर शिखर यांच्या लग्नाची चर्चा रंगील आहे. हिंदू पद्धतीत नुपूर आणि आयरा यांचं लग्न पार पडणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्ना आधीच्या विधींची सुरुवात 7 जानेवारी पासून झाली आहे. दोघांच्या लग्नात अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी राहणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे. लग्नानंतर 13 जानेवारी रोजी मुंबई येथे ग्रँड रिसेप्शन होणार आहे. आयरा – नुपूर यांच्या रिसेप्शनसाठी देखील अनेक बॉलिवूड उपस्थितीत राहणार आहेत.
आयरा आणि नुपूर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. नुपूर शिखरे फिटनेस ट्रेनर आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना नुपूर शिखरे याने ट्रेन केलं आहे. आयरा कायम नुपूर याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
आयरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री नसली तरी, आयरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आयरा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करते. चाहते देखील आयरा हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.