Ira Khan | सतत रडायची, फक्त झोपून असायची… आमिर खान याच्या मुलीवर का आली अशी वेळ?

| Updated on: Jul 09, 2023 | 2:45 PM

आमिर खान याच्या लेकीवर आलेली अशी वेळ... खुद्द आयरा खान हिने सांगितली प्रकृतीबद्दल 'ती' गोष्ट... सध्या सर्वत्र आयरा खान हिच्या प्रकृतीची चर्चा...

Ira Khan | सतत रडायची, फक्त झोपून असायची... आमिर खान याच्या मुलीवर का आली अशी वेळ?
Follow us on

मुंबई | झगमगत्या आयुष्यात आता सेलिब्रिटींपेक्षा अधिक त्यांच्या मुलांची चर्चा अधिक रंगलेली असते. महत्त्वाचं म्हणजे खान कुटुंबातील मुलांची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. अशात अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत साखरपुडा केला. ज्यामुळे आयरा तुफान चर्चेत आली. आयरा अभिनेत्री नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. आयरा कायम बॉयफ्रेंड नुपूर याच्यासोबत फोटो शेअर करत असते.

नुपूर शिरके याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे आयरा कायम चर्चेत असते. पण अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मत व्यक्त केल्यामुळे देखील आयरा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. आयरा खान हिच्या आयुष्यात अनेक चढ – उतार आले होते. एवढंच नाही तर आयराने डिप्रेशनचा देखील सामना केला आहे. याबद्दल खुद्द आमिरच्या लेकीने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र आमिर खान याची लेक आयरा खान याची चर्चा रंगत आहे.

डिप्रेशनमध्ये असताना आयरा तासोंतास रडायची. चार – चार दिवस आयरा जेवत देखील नव्हती. शिवाय सतत आयरा झोपायची… आयुष्यात योग्य निर्णय न घेतल्यामुळे डिप्रेशन आल्याचं वक्तव्य आयराने केलं होतं. स्वतःने डिप्रेशनचा सामना केल्यामुळे आयराने इतरांना डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली.

आता आयरा तिच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. आयरा खान ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताकडून झालेली मुलगी असून त्याबरोबरच त्याला जुनैद नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. आयरा खान कायम चर्चेत असते. २१ नोव्हेंबर २०२२ मध्ये आमिर खान याची मुलगी आयरा खान हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत साखरपुडा केला. आता चाहत्यांना दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.

कोण आहे नुपूर शिखरे ?

नुपूर शिखरे हा आमिर खान हिचा फिटनेस ट्रेनर आहे. रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा आयराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आयरा आणि नुपूर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली. आता दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.