बॉयफ्रेंड नाही तर, आमिर खानच्या लेकीचा आईसोबत खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Mar 05, 2023 | 4:54 PM

आयरा अभिनेत्री नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.. आमिर खान याची पहिली पत्नी रीना दत्ता आणि Ira Khan यांचा 'हा' फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत

बॉयफ्रेंड नाही तर, आमिर खानच्या लेकीचा आईसोबत खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Follow us on

Ira Khan Shares sweet photo with her mother : अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत साखरपुडा केला. ज्यामुळे आयरा तुफान चर्चेत आली. आयरा अभिनेत्री नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. आयरा कायम बॉयफ्रेंड नुपूर याच्यासोबत फोटो शेअर करत असते. पण आता आयराचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे, पण व्हायरल होत असलेला फोटो नुपूर याच्यासोबत नसून आई रीना दत्ता यांच्यासोबत आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र रीना दत्ता आणि आयरा खान यांच्या खास फोटोची चर्चा रंगत आहे.

फोटोमध्ये रीना दत्ता आणि आयरा खान यांच्यामध्ये असलेलं घट्ट नातं दिसत आहे. चाहत्यांना देखील आयरा हिचा आईसोबत असलेला फोटो प्रचंड आवडला आहे. फोटोमध्ये आयराने काळ्या रंगाचा ब्रालेट टॉप आणि शर्ट घातला आहे. तर रीना दत्ता यांनी सुंदर साडी नेसली. फोटोमध्ये दोघी प्रचंड आनंदी दिसत आहेत. सध्या सर्वत्र माय-लेकीच्या फोटोंची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

आयरा खान ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताकडून झालेली मुलगी असून त्याबरोबरच त्याला जुनैद नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. आयरा खान कायम चर्चेत असते. २१ नोव्हेंबर २०२२ मध्ये आमिर खान याची मुलगी आयरा खान हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत साखरपुडा केला. आता चाहत्यांना दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.

नुपूर शिखरे आणि आयरा खान यांनी ठराविक लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. साखपुड्यात आयराने लाल रंगाचा ड्रेस घातला होता.

 

 

नुपूर शिखरेचं कौतुक करताना इरा खानने एक पोस्ट शेअर करत बॉयफ्रेंडवर असलेलं प्रेम व्यक्त केलं होतं. नुपूर शिखरे आणि आयरा खान याच्या साखरपुड्याला आमिर खान, रीना दत्ता, किरण राव, फातिमा सना शेख, इम्रान खान, मन्सूर खान यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

कोण आहे नुपूर शिखरे
नुपूर शिखरे हा आमिर खान हिचा फिटनेस ट्रेनर आहे. रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा आयराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आयरा आणि नुपूर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली. आता दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.