मुंबई : नंबर 1 न्यूज नेटवर्क टीव्ही 9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कार्यक्रमाचा आज तिसरा दिवस आहे. आज सकाळपासूनच अनेक मान्यवर व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्रात उपस्थित राहिले. गेल्या कित्येक दिवसांपासून व्हॉट इंडिया थिंक्स टुडेची जोरदार तयारी ही केली जात होती. बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी या सत्राला उपस्थिती लावलीये. रवीना टंडन या सत्रात सहभागी झाली होती. थेट नेपोटिझमबद्दल बोलताना देखील रवीना टंडन ही दिसली. कंगना राणावतपासून ते आयुष्मान खुरानापर्यंत अनेक बाॅलिवूड कलाकार देखील उपस्थित होते.
नुकताच आता व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या तिसऱ्या दिवशीच्या सत्रात आमिर खान हा एक्स पत्नी किरण राव हिच्यासोबत सहभागी झाला. यावेळी ते लापता लेडीज चित्रपटाबद्दल बोलताना दिसले. हेच नाही तर अजूनही काही महत्वाची माहिती शेअर करताना आमिर खान हा दिसला आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या मंचावर दिलखुलास चर्चा करताना आमिर खान दिसला.
आमिर खान यावेळी त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल देखील बोलताना दिसला. आमिर खान म्हणाला की, मी सध्या सितारे जमीन पर या चित्रपटावर काम करत आहे. मी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. माझा हा चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हेच नाही तर अजून मी अति सुंदर या चित्रपटावर देखील काम करत आहे.
अति सुंदर हा चित्रपट सहा महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रत्यक्षात जरी मी लापता लेडीज चित्रपटात भूमिकेत नसलो तरीही मी या चित्रपटासोबत जोडलो गेलो आहे. लापता लेडीज हा चित्रपट 1 मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन किरण राव आणि आमिर खान यांच्याकडून केले जात आहे.
यावेळी किरण राव हिने देखील मोठा खुलासा केलाय. किरण राव म्हणाली की, इतके दिवस चित्रपटांपासून दूर राहण्याचे कारण मोठे आहे. मी माझ्या मुलाला जास्त वेळ देत होते. आता तो बऱ्यापैकी मोठा झाल्याने मी परत चित्रपटांकडे वळले आहे. आता करण राव हिचा हा चित्रपट नेमका काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.