बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शिका किरण राव यांच्या घटस्फोटाला आता तीन वर्ष झाली आहे. 16 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. घोषणेनंतर चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला. घटस्फोटानंतर देखील किरण राव अभिनेत्याच्या पहिल्या कुटुंबासोबत कोणत्याही कार्यक्रमात दिसते. सांगायचं झालं तर, आमिर खान याची दोन्ही कुटुंब एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. दरम्यान, ‘लापता लेडिज’ सिनेमाचं प्रमोशन सुरु असताना किरण राव हिने ‘घटस्फोटानंतर आनंदी आहे…’ असं वक्तव्य केलं होतं.
आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने यामागचं कारण सांगितलं आहे. घटस्फोटनंतर बदललेल्या आयुष्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला असं वाटतं की काही वेळ गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या नात्याला वेगळ्याप्रामाणे परिभाषित करावं लागतं. याचं कारण म्हणजे, आपण जसे-जसे मोठे होत जाते, तसं एक व्यक्ती म्हणून आपल्यामध्ये अनेक बदल होत असतात. आपल्याला वेग-वेगळ्या गोष्टींची गरज भासू लागते. मला असं वाटतं की घटस्फोटानंतर मी अधिक आनंदी झाली आहे. याला तुम्ही एका आनंदी घटस्फोट देखील म्हणू शकता…’
पुढे किरणा राव म्हणाली, ‘जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा अनेक वर्ष मी एकटी राहिली होती. मी लग्नाआधी माझ्या आयुष्याचा आणि स्वातंत्र्याचा पूर्ण आनंद घेतला आहे. तेव्हा मला एकटं असल्यासारखं व्हायचं. पण आता माझ्या मनात तशा भावना नाहीत. कारण आता माझ्यासोबत माझा मुलगा आहे. मी आझाद याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.’
‘घटस्फोटानंतर आयुष्यात एकटं पडल्यासारखं अनेकांना वाटतं. पण मला असं कधीच वाटलं नाही. कारण आमिरच्या कुटुंबाने कधीच मला एकटीला सोडलं नाही. त्यांच्याकडून मला पूर्ण पाठिंबा मिळाला. आम्हाला घटस्फोट घेण्यासाठी फक्त एका कागदाची (घटस्फोटाचा अर्ज) गरज होती. पण आम्हाला माहिती होतं की, आम्ही एकमेकांसाठी किती महत्त्वाचे आहोत.. ही गोष्ट आम्हाला माहिती होती.’
‘आजही आमच्यात भरपूर प्रेम आहे. आमच्या जुन्या आठवणी माझ्यासोबत आहेत. ज्या मी कधीच नाही विसरणार..’ असं देखील किरण राव म्हणाली. किरण राव कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. सावत्र मुलगी आयरा खान हिच्या लग्नात देखील किरण राव आनंदी दिसली. शिवाय आयराच्या लग्नात किरण हिने गाणं देखील गायलं होतं…