मुंबई : अभिनेता आमिर खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.. आता देखील अभिनेता एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. आमिर खान सध्या त्याच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्यामुळे चर्चेत आला आहे. एका व्हिडीओमुळे फातिमा आणि आमिर पुन्हा चर्चेत आले आहेत. आमिर आणि फातिमा हे मुंबईत पिकलबॉल हा खेळ खेळताना दिसले. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमिर आणि फातिमा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.. याच दरम्यान बॉलिवूडच्या एक प्रसिद्ध अभिनेत्याने आमिर अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्यासोबत लग्न करणार असल्याचा दावा केला आहे…
आमिर अभिनेत्री फातिमा सना शेख लग्न करणार असल्याचा दावा केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता तुफान चर्चेत आला आहे. फातिमा आणि आमिर यांच्या लग्नाचा दावा करणार अभिनेता दुसरा तिसरी कोणी नसून अभिनेता आणि विश्लेषक कमाल राशिद खान म्हणजे केआरके आहे.. ट्विट करत केआरके याने फातिमा आणि आमिर यांच्या लग्नाचा दावा केला आहे..
केआरके ट्विट करत म्हणाला, ‘ब्रेकिंग न्यूज… आमिर त्याच्या मुलीच्या वयाची फातिमा सना शेख हिच्यासोबत लवकरच लग्न करणार आहे. ‘दंगल’ सिनेमापासून आमिर खान, फातिमा सना शेख हिला डेट करत आहे..’ केआरके याने केलेल्या दाव्यामुळे चाहते हैराण झाले आहेत. सध्या सर्वत्र केआरके याच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.
Breaking News:- Aamir Khan is going to get married with his daughter’s age Fatima Sana Shaikh soon. Aamir Khan is dating Sana from the time of their film #Dangal.
— KRK (@kamaalrkhan) May 25, 2023
केआरके याच्या ट्विटवर नेटकरी कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘विश्वासच होत नाही..’ तर दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘एवढी मोठी बातमी देण्यासाठी शुभेच्छा…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त केआरके आणि अभिनेत्याच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.. केआरके कायम कोणत्याही मुद्द्यावर वक्तव्य करत असतो.. अभिनेत्याला त्याचा वक्तव्यामुळे वादग्रस्त परिस्थितीचा देखील सामना कराला लागतो…
फातिमा सना शेख आणि आमिर खान यांनी दंगल सिनेमा एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात आमिर याने फातिमाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. यानंतर दोघेही ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमात देखील मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले. दोन सिनेमांमध्ये एकत्र काम केल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला. पण अद्याप फातिमा आणि आमिर यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही..
आमिर खानने लग्नाच्या 16 वर्षांनंतर पत्नी किरण रावपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून फातिना आणि आमिर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला. शिवाय आता मुंबईत पिकलबॉल हा खेळ खेळताना एकत्र दिसल्यानंतर पुन्हा दोघांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत आहेत..