लग्नाला चार महिने पूर्ण होताच प्रचंड हादरली आमिर खानची लेक, इराच्या पोस्टमुळे मोठी खळबळ, म्हणाली, एकटेपणा..

| Updated on: Apr 21, 2024 | 12:58 PM

Ira Khan : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान याची लेक इरा खान ही नेहमीच चर्चेत असते. चार महिन्यांपूर्वीच इरा खान हिचे लग्न अत्यंत शाही थाटात राजस्थानमध्ये पार पडले. या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली इरा खान हिने नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केले. आता नुकताच एक हैराण करणारी पोस्ट इरा खानने शेअर केलीये.

लग्नाला चार महिने पूर्ण होताच प्रचंड हादरली आमिर खानची लेक, इराच्या पोस्टमुळे मोठी खळबळ, म्हणाली, एकटेपणा..
ira khan
Follow us on

आमिर खान याची लेक इरा खान ही नेहमीच चर्चेत असते. इरा खान हिने नुपूर शिखरे याच्यासोबत चार महिन्यांपूर्वीच राजस्थान येथे लग्न केले. विशेष म्हणजे इरा खान आणि नुपूर यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले आणि अनेक कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. इरा खान ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना इरा खान दिसते. आता इरा खान हिची एक पोस्ट तूफान चर्चेत आलीये.

इरा खान हिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. इरा खान हिला भीती वाटत आहे. आता इरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाली आहेत. इरा खान हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मला भीती वाटते, मला एकटेपणाची प्रचंड अशी भीती वाटते. मला लाचार होण्याचीही भीती वाटते. जगातील प्रत्येक वाईट गोष्ट जसे की (क्रूरता, आजारपण, हिंसा) यांचीही भीती वाटते.

पुढे इरा खान हिने लिहिले की, मला माझी आई गमवण्याचीही भीती वाटते. हेच नाही तर मला वेदना होण्याचीही भीती वाटते. गप्प होण्याची भीती वाटते. या भीतीवर कोणताच उपाय नाही. गाणे किंवा एखादा चित्रपट पाहिल्याने यामधून बाहेर निघण्यास मदत होते, असेही इरा खान हिने म्हटले आहे. सर्वकाही ठिक आहे, हे ज्यावेळी सांगितले जाते, त्यावेळीही ठीक वाटत असल्याचे इरा खान सांगते.

आपल्या जवळचे लोक आहेत, जे आपल्यावर खूप प्रेम करतात, तरीही एकटेपणाची भीती वाटते असेही इराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. आता इरा खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. लग्नाला अवघे चार महिने पूर्ण झाल्यानंतर अशाप्रकारची पोस्ट इरा खान हिने लिहिल्याने विविध चर्चा या प्रचंड रंगताना देखील दिसत आहेत.

या पोस्टवर अनेक कमेंट करून लोक हे इरा खान हिला प्रश्न विचारताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, आताच तुझे लग्न झाले मग तू एकटी कशी? दुसऱ्याने लिहिले की, मध्यंतरी तुझ्या घटस्फोटाची चर्चा होती, सर्व ठीक आहे ना? काही दिवसांपूर्वीच इरा खान हिच्या घटस्फोटाची चर्चा तूफान रंगताना दिसली होती. त्यावेळीही एक अशाच प्रकारची पोस्ट ही इरा खान हिने सोशल मीडियावर शेअर केली होती. इरा खान नेहमीच आपल्या पर्सनल लाईफबद्दल खुलासा करताना दिसले.