Ira khan : बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान ही काही दिवसापूर्वीच नुपूर शिखरेसोबत विवाहबंधनात अडकली आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर या जोडप्याने मुंबईत रिसेप्शन दिले होते, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते. आता आयरा आणि नुपूर शिखरे बालीमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत. त्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.
आज 25 जानेवारीला आयरा खानने तिच्या हनीमून डायरीतील नुपूर शिखरेसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आयरा खांद्यावर टॉवेल गुंडाळून लाल बिकिनीमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. यानंतर तिची पती नुपूरही कोझी पोज देताना दिसत आहे.
आयराने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती एकटीच सेल्फी घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये रेड-रेड लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत ती नुपूरसोबत दिसत आहे.
याआधीही आयराने हनिमूनला जाताना आणि मस्ती करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
आयरा खान आणि नुपूर शिखरे जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आयराचा नवरा सेलिब्रिटी आणि आमिरचा फिटनेस ट्रेनर आहे. या जोडप्याने 2022 मध्ये लग्न केले आणि 3 जानेवारी 2024 रोजी दोघांनी कोर्टात लग्न केले. यानंतर उदयपूरमध्ये आयरा आणि नुपूरचे डेस्टिनेशन वेडिंग तीन दिवस चालले. मेहेंदी, हळदी आणि संगीत समारंभानंतर या जोडप्याचा 10 जानेवारीला विवाह झाला. त्यानंतर मुंबईत येऊन रिसेप्शन दिले. आता दोघे ही हनिमूनवर आहेत.