मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आमिर खान हा लाल सिंह चड्ढा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठ्या पडद्यापासून दूर गेला. चित्रपट फ्लाॅप गेल्याने तो निराश झाला. आता शेवटी आमिर खान याने पर्दापण केले. हेच नाही तर त्याने नुकताच आपल्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगला सुरूवात देखील केलीये. आमिर खान याच्या खासगी आयुष्यामध्ये मोठ्या घडामोडी देखील घडताना दिसल्या. आमिर खान हा मुंबई सोडून चेन्नईला शिफ्ट होणार असल्याचेही सांगण्यात आले. आता नुकताच आमिर खानची एक्स पत्नी किरण राव हिने हैराण करणारे खुलासे केले.
आमिर खान आणि किरण राव यांचे लग्न 2005 मध्ये झाले. इतक्या वर्षांनंतर अचानकपणे 2021 मध्ये किरण आणि आमिर यांनी घटस्फोट घेतला. आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे अजूनही कळू शकले नाही. मात्र, घटस्फोटानंतर अनेकदा किरण आणि आमिर खान हे स्पाॅट होताना दिसतात. आता नुकताच किरणने मोठा खुलासा केला.
किरण राव हिने दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे केले. किरण राव म्हणाली की, मी निर्लज्ज आहे. होय मी खरंच निर्लज्ज आहे. कारण मी घटस्फोटानंतरही आमिर खान याचा फायदा घेत आहे. हेच नाही तर त्याचे पैसे देखील मी चित्रपटाला लावले असल्याचे सांगताना किरण राव ही दिसली. मी आमिरच्या फेमचा फायदा घेत असल्याचेही तिने म्हटले.
आता किरण राव हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. पहिल्यांदाच आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना किरण राव ही दिसलीये. किरण राव हिने थेट घटस्फोटानंतरही आपण आमिर खान याचे पैसे वापरत असल्याचे देखील म्हटले. फक्त हेच नाही तर त्याचा फेमचा देखील फायदा घेत असल्याचे किरण राव हिने मान्य केले आहे.
घटस्फोटानंतरही मी आणि आमिर खूप चांगले मित्र असल्याचे काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगताना किरण राव ही दिसली. हेच नाही तर आम्ही एकत्र जेवण करतो आणि एकाच इमारतीमध्ये राहतो हे देखील किरण राव हिच्याकडून सांगण्यात आले. आता दिलेल्या मुलाखतीमुळे किरण राव ही तूफान चर्चेत आल्याचे देखील बघायला मिळत आहे. काही लोक हे किरण राव हिच्यावर टीका देखील करत आहेत.