मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : आमिर खान(Aamir Khan) हा बॉलिवूडमधील असा स्टार आहे जो केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. त्याची दोन लग्नं झाली होती, हे सर्वांनाच माहीत आहे. आमिरचे पहिले लग्न रीना दत्ता (ReenaDutta) हिच्याशी झाले होते. तिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी त्याने किरण राव (Kiran Rao) हिच्यासोबत दुसरे लग्न झाले.
मात्र काही वर्षांपूर्वी त्या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला होता. त्यामुळे रीना आणि किरण या दोघीही आता आमिरच्या Ex-wife झाल्या आहेत. मात्र असं असतानाच या दोघीही नुकत्याच एकत्र स्पॉट झाल्या, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये आमिर खानच्या दोन्ही माजी पत्नी एकत्र दिसत आहेत. एका कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या किरण आणि रीना मस्त, हसताना दिसत आहेत. आमिर खानचा भाऊ मन्सूर खान याचे ‘ वन: द स्टोरी ऑफ द अल्टीमेट मिथ’ हे पुस्तक नुकतेच लाँच करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रीना व किरण दोघीही उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी पापाराझींसमोर पोजही दिली.
अशा अंदााजात दिसल्या रीना आणि किरण
या कार्यक्रमासाठी रीना दत्ता ही निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये आली होती, त्यासोबत तिने हिरव्या रंगाची बॅग कॅरी केली होती. तर किरण राव हिने लाईट ग्रीन कुर्ता व त्यावर ब्ल्यू जॅकेट परिधान केले होते. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला असून बहुतांश लोकं हे आमिर खानच्या दोन्ही माजी पत्नींना ट्रोल करत आहेत. आमिरपासून वेगळ्या झाल्याने दोघीही खुश आहेत, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर हे लोक किती नॉर्मल (वागत) आहेत, आम्ही तर आमच्या एक्सच्या, एक्सचे तोंडही पाहणार नाही, अशी कमेंट आणखी एका युजरने केली आहे.
दोघींसोबत झाला आमिरचा घटस्फोट
आमिर खान आणि रीना दत्ता यांचे लव्ह मॅरेज होते. 18 एप्रिल 1986 रोजी आमिरने रीनाशी लग्न केले. या दोघांनाही आयरा ही लेक तर जुनैद हा मुलगा आहे. आयरा अनेकदा सोशल मीडियावर दिसून येते. पण जुनैद हा लाइमलाइटपासून दूर राहतो. 16 वर्षांनंतर 2002 साली आमिर व रीनाने घटस्फोट घेतला. त्यानंतर 2005 साली आमिरने किरण रावशी लग्न केले पण १५ वर्षांनी 2020 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. असं असलं तरी आमिर अनेकदा किरण रावसोबत दिसत असतो.