मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झालाय. आमिर खान याचा या चित्रपटाकडून प्रचंड असा अपेक्षा होत्या. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाल सिंह चड्ढा फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. आमिर खान याने सांगितले की, सतत गेल्या काही वर्षांपासून चित्रपटात (Movie) काम करत असल्याने कुटुंबियांना अजिबातच वेळ देऊन शकतो नाहीये, यामुळे काही वर्षे त्यांना वेळ देणार आहे.
आमिर खान हा नेमक्या कोणत्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. सोशल मीडियावरही आमिर खान हा फार काही सक्रिय दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वी त्याने सलमान खान याच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. सलमान खान हा आमिर खान याच्या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा आहेत.
नुकताच सोशल मीडियावर आमिर खान याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आमिर खान हा जबरदस्त असा भांगडा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका पंजाबी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळीचा असल्याचे सांगितले जातंय. आमिर खान याच्यासोबत या व्हिडीओमध्ये दुसरे बरेच लोक भांगडा करताना दिसत आहेत.
आमिर खान याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी आमिर खान याच्या या व्हिडीओवर कमेंट देखील केल्या आहेत. एकाने आमिर खान याच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, हा अभिनेता मला फार जास्त आवडतो. दुसऱ्याने लिहिले की, हा आमिर खान नेमका कुठे भांगडा करत आहे.
आमिर खान याच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटात करीना कपूर खान ही देखील मुख्य भूमिकेत होती. मुळात म्हणजे लाल सिंह चड्ढा या चित्रपटाला सोशल मीडियावर तूफान अशा विरोध सातत्याने केला जात होता. सतत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली जात होती. याचाच फटका चित्रपटाला बसल्याचे सांगितले जातंय. चित्रपटाचे बजेट काढणे देखील आमिर खान याला शक्य झाले नाही.