आराध्याकडे प्रायव्हेट नर्स आहे, ती सुद्धा…, ऐश्वर्याबद्दल जया बच्चन असं का म्हणाल्या?

| Updated on: Apr 12, 2024 | 9:00 AM

Aishwarya Rai | गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबाची चर्चा तुफान रंगत आहे. दरम्यान ऐश्वर्या राय - जया बच्चन यांच्यातील मतभेदाची सर्वत्र चर्चा रंगत आहे... मुलखातीत आराध्या आणि तिच्या आईबद्दल जया बच्चन यांनी केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत...

आराध्याकडे प्रायव्हेट नर्स आहे, ती सुद्धा..., ऐश्वर्याबद्दल जया बच्चन असं का म्हणाल्या?
Follow us on

महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाची चर्चा कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगत असते. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबातील वादाची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय हिच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यासोबत घटस्फोट आणि जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या मतभेदांबद्दल चाहते थक्क आहेत… आता बद्दल कुटुंबातील वाद समोर येत आहेत, पण एक काळ असा होता जेव्हा जया बच्चन – ऐश्वर्या यांच्यातील नातं घट्ट होतं…

एका जुन्या मुलाखतीत जया बच्चन यांनी ऐश्वर्या राय हिच्याबद्दल विनोदी वक्तव्य केलं होतं. जया बच्चन म्हणाल्या होत्या मी कायम ऐश्वर्याला आराध्या हिच्यामुळे चिडवत असते… जया म्हणायच्या, ‘आराध्या हिच्याकडे एक नर्स आहे आणि ती पण मिस वर्ल्ड…’

हे सुद्धा वाचा

 

 

ऐश्वर्या हिचं कौतुक करत जया बच्चन म्हणाल्या होत्या, ‘एक आई म्हणून ऐश्वर्या कोणावर अवलंबून नाही… ही गोष्ट फार चांगली आहे आणि मला आता असं वाटतं ऐश्वर्याने आता यातून बाहेर यावं…’ सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर लग्नाच्या पाच वर्षानंतर ऐश्वर्या हिने आराध्या हिला जन्म दिला. आराध्या हिचा जन्म 2007 मध्ये झाला. आता ऐश्वर्या – अभिषेक यांची लेक 13 वर्षांची आहे. बच्चन कुटुंबाची लेक असल्यामुळे आराध्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आराध्या तिच्या लूक आणि हेयरस्टाईलमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर आराध्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

अभिषेक – ऐश्वर्या आराध्यासोबत परदेशात होणार शिफ्ट?

रिपोर्टनुसार, अभिषेक – ऐश्वर्या यांनी लेक आराध्या हिच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आराध्या बच्चन पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. पुढच्या शिक्षणासाठी आराध्या लंडन किंवा न्यूयॉर्क याठिकाणी जाऊ शकते. असं सांगण्यात येत आहे. सध्या आराध्या धीरुबाई अंबानी शाळेत शिक्षण घेत आहे. 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या परदेशात जाईल.. असं सांगण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी आराध्या हिला आई ऐश्वर्या हिच्यासोबत स्पॉट देखील केलं जातं. ऐश्वर्या देखील आराध्या हिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र आराध्या आणि ऐश्वर्या यांची चर्चा रंगली आहे.