‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सोशल मीडिया स्टार स्पर्धक म्हणून एकत्र आले. पण टॉप 5 पर्यंत कृतिका मलिक, रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल आणि नेजी हे स्पर्धक टिकू शकले. अखेर सना मकबूल हिने ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोची ट्रॉफी जिंकली आहे. पण शोमध्ये चर्चा रंगली ती म्हणजे युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या खासगी कुटुंबाची. बिग बॉसमध्ये अरमान याने पहिली पत्नी पायल आणि दुसरी पत्नी कृतिका यांच्यासोबत प्रवेश केला. पण पायल मलिक पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडली. त्यानंतर अरमान घराबाहेर पडला आणि कृतिका टॉप 5 पर्यंत पोहोचली.
सांगायचं झालं तर अरमान मलिक कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. शिवाय अरमान मलिक हिंदू आहे मुस्लीम? अशा चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अरमान याने स्वतःच्या धर्माबद्दल मोठा खुलासा केला आहे.
सांगायचं झालं तर, हिंदू विवाह कायद्यानुसार, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करता येत नाही. त्यामुळे पायल हिला घटस्फोट न देता कृतिका हिच्यासोबत लग्न करता यावं म्हणून मुस्लीम धर्म स्वीकारला का? असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून अरमान याला विचारण्यात येत आहेत.
नुकताच झालेल्या मुलाखतीत दोन लग्न करण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार केला का? असा प्रश्न अरमान याला विचारण्यात आला. यावर अरमान म्हणाला, ‘मी हिंदू आहे. माझ्या नावामुळे अनेकांना वाटतं की मी मुस्लीम आहे. पण असं काहीही नाही. मी हिंदू धर्माला मानतो. 14 वर्षांचा असताना स्टेज शो करायचो. तेव्हा माझा नाव संदीप मलिक होतं. मी स्वतःचं नाव बदलून अरमान मलिक असं केलं…’ असं देखील अरमान मलिक मुलाखतीत म्हणाला.
सोशल मीडियावर कायम अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. बिग बॉसच्या घरात अरमान, पायल, कृतिका यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ज्यामुळे मलिक कुटुंब आाणखी चर्चेत आलं.