बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणजे अभिनेता सलमान खान याचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा सध्या ‘रुसलान’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान अभिनेता त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष याने त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणी ताज्या केल्या आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमातील ‘दल्ली वाली गर्लफ्रेंड’ गाण्यात आयुष शर्मा बॅकग्राऊंड डान्सर होता.
आयुष शर्मा म्हणाला, ”ये जवानी है दिवानी’ सिनेमासाठी मी पहिल्यांदा मेहबूब स्टुडियोमध्ये आलो होतो. अनेकांनी मला विचारलं बॅकग्राऊंड डान्सर म्हणून का काम करत आहेस… मला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचं होतं. पण त्या दिवशी मी मेहबूब स्टुडियोमध्ये पोहोचलो तेव्हा 300 ते 400 बॅकग्राउंड डान्सर तिकडे उपस्थित होते. मी देखील त्यांच्यामधील एक होतो…’
‘ते क्षण प्रचंड उत्तम होते… मनीष मल्होत्रा, दीपिका पादुकोन, रणबीर कपूर, कल्की केक्ला यांना सेटवर पाहिलं. आम्हाला ‘दिल्ली वाली गर्लफ्रेंड’ गाण्यासाठी एक स्टेप दिली होती. तेव्हा मी स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होतो. कारण मला कॅमेऱ्या समोर यायचं नव्हतं. पण तरी देखील ते मला पुढे बोलवत होते. तेव्हा माझ्याकडे फक्त 20 रुपये होते…’ असं देखील अभिनेता म्हणाला… सध्या सर्वत्र फक्त आणि आयुष शर्मा याची चर्चा रंगली आहे.
तेव्हा आयुष याच्याकडे फक्त 20 रुपये होते. अशात दुसऱ्या दिवशी काय करायचं असा प्रश्न सतत अभिनेत्याला सतावत होता. अशा परिस्थितीत आयुष याला शुटिंगसाठी कॉल आला. ‘तेव्हा माझ्याकडे फक्त 20 रुपये होते, आता कोट्यवधी रुपये आहेत..’ असं देखील अभिनेता म्हणाल…
2014 मध्ये अर्पिता आणि आयुष यांचं मोठ्या थाटात लग्न झालं. दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आज दोघे आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. अर्पिता कायम पती आणि दोन मुलांसोबत फोटो – व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.