‘त्याने हे विसरू नये की..’; ‘इंडियन आयडॉल 1’चा रनरअप अमित सानाला अभिजीत सावंतचं सडेतोड उत्तर

| Updated on: Nov 18, 2023 | 9:19 AM

इंडियन आयडॉलच्या पहिल्या सिझनचा रनरअप अमित साना याने बऱ्याच वर्षांनंतर शोवर काही आरोप केले. त्या आरोपांवर आता विजेता अभिजीत सावंतने प्रतिक्रिया दिली आहे. ग्रँड फिनालेपूर्वी माझे वोटिंग लाइन्स बंद केल्याचा आरोप अमितने केला. यावर अभिजीतीने सडेतोड उत्तर दिलं.

त्याने हे विसरू नये की..; इंडियन आयडॉल 1चा रनरअप अमित सानाला अभिजीत सावंतचं सडेतोड उत्तर
Amit Sana and Abhijeet Sawant
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 18 नोव्हेंबर 2023 | ‘इंडियन आयडॉल’ हा गाण्याचा रिॲलिटी शो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला. यातील स्पर्धकांपासून परीक्षकांनी आणि पाहुण्यांनीही शोवर बरेच आरोप केले आहेत. त्यातच आता ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सिझनमधील रनरअप अमित साना याने बऱ्याच वर्षांनंतर शोबद्दल धक्कादायक खुलासे केले. ग्रँड फिनालेच्या दोन दिवस आधी माझी वोटींग लाइन बंद करण्यात आल्याचा आरोप त्याने वाहिनीवर केला आहे. त्यावेळी इंडियन आयडॉल हा शो तुफान लोकप्रिय झाला होता आणि मराठमोळा स्पर्धक अभिजीत सावंतने त्यात बाजी मारली होती. अभिजीतला विजेता बनवण्यासाठी निर्मात्यांनी अशी खेळी खेल्याचा, मोठा आरोप अमितने आता केला आहे. त्यावर आता अभिजीतनेही प्रतिक्रिया दिली आहे. अमित हा अत्यंत भोळा आहे आणि शोमध्ये तो रनरअप होता हे त्याने विसरू नये, असं अभिजीत म्हणाला.

आरोपांवर अभिजीत सावंतची प्रतिक्रिया

‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत म्हणाला, “तो खूप भोळा आहे. मी बऱ्याच स्पर्धकांमध्ये भाग घेतला आहे. स्पर्धेत पराभूत होण्याची अनेक कारणं असतात. फक्त एकच कारण नसतं. त्याने हे विसरू नये की तो शोमध्ये रनरअप ठरला होता. शोमध्ये फक्त आम्ही दोघंच खूप प्रतिभावान होतो अशी गोष्ट नव्हती. त्या स्पर्धेत इतरही अनेक प्रतिभावान लोक होते. मला असं वाटतं, की त्याच्या लोकांनी त्याचे कान भरले असतील आणि हे सर्व भावनाप्रधान असू शकतं.”

हे सुद्धा वाचा

अमित सानाने काही स्पर्धकांवर राजकीय प्रभुत्व असल्याचाही आरोप केला होता. त्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अभिजीत म्हणाला, “हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. संपूर्ण देशभरातून आम्हाला मतदान केलं जात होतं. त्यामुळे एकाला मतं मिळतायत आणि दुसऱ्याला नाही, असं कसं होऊ शकतं? इंडियन आयडॉल 1 या शोवर इंटरनॅशनल टीमचंही लक्ष होतं. ते सेटवर नेहमीच असायचे, हे मला अजूनही आठवतंय. त्यामुळे राजकीय प्रभुत्वसारख्या गोष्टींबद्दल आता चर्चा करणं मला अयोग्य वाटतं. आता त्या गोष्टींचा काहीच अर्थ नाही.”

काय होते अमित सानाचे आरोप?

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अमित सानाने आरोप केले की की ग्रँड फिनालेच्या दोन दिवस आधीपासून त्याची वोटिंग लाइन बंद करण्यात आली होती. अभिजीत सावंतला विजेता बनवण्यासाठी वाहिनीकडून असं करण्यात आल्याचा आरोप अमितने केला आहे. अमितने सांगितलं की या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा त्याने अभिजीला विचारलं की तुझे वोटिंग लाइन्स चालू आहेत का? त्यावर अभिजीतने त्याला होकारार्थी उत्तर दिलं होतं. माझे कुटुंबीय अभिजीतला वोट करू शकत होते, पण मला नाही, असंही अमित म्हणाला.

“त्यावेळी राजकीय प्रभावसुद्धा खूप होता. मात्र ग्रँड फिनालेमध्ये मी खूप चांगला परफॉर्म केला होता. जेव्हा शिल्पा शेट्टीने अभिजीतच्या हास्याचं कौतुक केलं, तेव्हापासून त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जाऊ लागलं. याच कारणामुळे त्याला जास्त वोट्स मिळाले,” असाही आरोप त्याने केला.