अभिजीत सावंत सोशल सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. आजकाल तो बरेच व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी अभिजीतने त्याचे हाताचे बोट बरं झाल्याचे सांगत एका हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. चाहत्यांनी त्याला काळजी घेण्यास सांगितले होते. आता अभिजीतने अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे जो चक्क बाथरुममधील आहे.
बाथरुममधील एक डान्स व्हिडीओ
अभिजीत सावंतने त्याचा बाथरुममधील एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अभिजीत ‘अफगान जलेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिजीतने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि शिमरी अन् काळ्या रंगाचा कोट घातलेला असून डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगलही दिसत आहे.
दरम्यान हा व्हिडीओ त्याने शोच्या आधी शेअर केला असल्याचं त्याच्या कॅप्शनमधून समजतं. “शोच्या आधी अतिउत्साह…आणि बाथरुममध्ये सुंदर दिवे…तर मग नाच, गाणं व्हायलाच पाहिजे”,असं कॅप्शन लिहित अभिजीत सावंतने डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
नेटकऱ्यांकडून डान्सचे कौतुक
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अभिजीतसाठी बिग बॉस पुन्हा बघत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अभिलाषा मोड ऑन…खूप छान…आम्हाला तुमची आठवण येतेय.” तर, एकाने लिहीलं आहे “आग लावली भावा”, अशा पद्धतीने अभिजीतचा हा डान्स पाहून चाहत्यांनी तर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नेहमी आपल्या आवाजाने चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या अभिजीतने आज डान्सनेही सर्वांची मने जिंकली असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 3’ च्या महाअंतिम सोहळ्यात अभिजीत पाहायला मिळणार आहे. शनिवार 9 आणि रविवार 10 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.