‘बिग बॉस मराठी 5’ च्या पर्वात सर्वच स्पर्धक एकापेक्षा एक होते. सर्वांनीच खरतर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यात शेवटपर्यंत गेलेले स्पर्धक म्हणजे अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण. अभिजीत सावंत मात्र कधी टास्कमुळे,कधी निक्कीसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी अंकितासोबतच्या मैत्रीमुळे तसेच त्याच्या शांत स्वभावामुळे आणि मुख्यत: त्याला टास्कमध्ये झालेल्या दुखापतीमुळे तर तो फारच चर्चेत आला. हा सगळा प्रवास करत तो या पर्वाचा उपविजेता ठरला. मात्र बिग बॉस संपल्यानंतर, सोशल मीडियावर तो बिग बॉसचे अनेक किस्से सांगताना दिसतो.
बोटांच्या बॅंडेजवरून काय म्हणाला अभिजीत?
अभिजीतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्याने त्याल्या झालेल्या जखमांबद्दल सांगितले आहे. बिग बॉसच्या शोमध्ये त्याला गुडघ्याला आणि हाताच्या बोटांना दुखापत झाली होती. या शोमधून बाहेर पडल्यानंतरदेखील त्याच्या हाताला बँडेज तसेच आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी कित्येकदा मजेशीर कमेंटही केली आहे. आता याबद्दलचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला अभिजीतच्या पत्नीचा शिल्पाचा आवाज ऐकू येत आहे. ती गाडी चालवत असलेल्या अभिजीतला विचारते की, आज कुठे चाललोय आपण? त्यावर अभिजीत तिला ज्या बोटांना दुखापत झाली आहे आणि बँडेज केले आहे ते दाखवतो. त्यानंतर शिल्पा म्हणते, यामागची गोष्ट तुम्हाला लवकरच कळेल. मग त्यावर अभिजीत म्हणतो, “ही बंदूक आज मी या दोन बोटांतून काढून टाकणार आहे”.
बँडेज काढल्याबद्दल आनंद व्यक्त
त्यानंतर दवाखान्यातील व्हिडीओ आहे, ज्यामध्ये त्याच्या बोटांवरून बँडेज आणि स्क्रू काढल्याचे दिसत आहे. हे बॅंडेज काढल्यानंतर छान वाटत असल्याचं अभिजीतने व्यक्त केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, “बिग बॉसच्या घरात असल्यापासून सांभाळून ठेवलेली ही बंदूक फायनली माझ्या हातातून काढून टाकलेली आहे! आता बरा होत असून आता दिवाळी आनंदी आहे, अशी कॅप्शन अभिजीतने या व्हिडीओला दिले आहे.
व्हिडीओ पाहून चाहते भावनिक
बिग बॉसमध्ये अभिजीतने आपल्या खेळाने आणि स्वभावाने प्रेक्षकांचे मने जिंकली. आज त्याचं चाहत्यांनी अभिजीतचा हा व्हिडीओ पाहून भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांनी त्याच्या या साहसाचं कौतुक करत त्याला काळजी घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान अभिजीत सावंत उपविजेता जरी ठरला असला तरी सूजरच्या विजयावर त्याने मनापासून आनंद व्यक्त केला होता. तर, अभिजीत अखेर या बँडेजच्या बंधनातून मोकळा झाला आहे. त्याने याबद्दल आपल्या चाहत्यांसोबत व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.