अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. मात्र, यावर कधीच बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामधील तणाव वाढल्याचे देखील सांगितले जातंय. मुळात म्हणजे काही कारणे आहेत, ज्यामुळे सतत यांच्या घटस्फोटाची चर्चा ही रंगताना दिसते. मनीष मल्होत्रा याच्या दिवाळी पार्टीला ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत पोहचली होती. पार्टीत बच्चन कुटुंबियांपासून दूर ऐश्वर्या राय ही दिसली. हेच नाही तर अंबानींच्या पार्टीला देखील ऐश्वर्या राय मुलीसोबतच पोहचले होती.
अगस्त्य नंदाच्या बहादुर चित्रपटाला अभिषेक बच्चन हा एकटाच पोहचला होता. यावेळी ऐश्वर्या राय हिच्याबद्दल विचारण्यात आले, त्यावेळी त्याने बोलणे टाळले. 2023 मध्ये बाॅलिवूड पार्टींमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे फार कमी वेळा एकत्र दिसले. हेच नाही तर बच्चन कुटुंबियांवर ऐश्वर्या राय ही नाराज असल्याची चर्चा तेंव्हापासूनच खरी रंगताना दिसली.
गेल्या वर्षी 16 नोव्हेंबरला आराध्या बच्चन हिचा बारावा बर्थडे साजरा करण्यात आला. मात्र, या बर्थडेला बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच उपस्थित नव्हते. फक्त अभिषेक बच्चन सोडला तर जया बच्चन, अभिताभ बच्चन, श्वेता बच्चन हे कोणीच आराध्याच्या बर्थडे पार्टीत हजर नव्हते. यावरूनच चर्चा रंगली होती की, ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झालाय.
हेच नाही तर 2023 मध्ये बच्चन कुटुंबियांसोबत ऐश्वर्या राय हिने दिवाळी साजरी केली नव्हती. ती मुंबईच्या बाहेर असल्याचेही सांगितले गेले होते. एका कार्यक्रमात ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्याकडे काहीतरी बोलण्यासाठी जाताना दिसली. मात्र, ऐश्वर्या आपल्याकडे येताना पाहून रागात अभिषेक बच्चन निघून जाताना देखील दिसला होता, ज्याचे व्हिडीओ व्हायरल झाले.
याच सर्व गोष्टींमुळेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये काहीतरी खटकल्याचे बोलले जात आहे. हेच नाही तर लवकरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेऊ शकतात असेही सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच अशी देखील चर्चा होती की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले असून ती तिच्या आईच्या घरी शिफ्ट झालीये. अजूनही घटस्फोटाबद्दल बच्चन कुटुंबियांनी काहीच भाष्य केले नाहीये.