मुंबई | ८ ऑगस्ट 2023 : अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या सिनेमांची आजही चर्चा रंगत आसते. पण आता जया बच्चन यांना त्यांच्या रागीट स्वभावामुळे कायम ट्रोल केलं जातं. अनेकदा जया बच्चन यांना सर्वांसमोर अनेकदा भडकताना पाहिलं आहे. पापाराझी, फोटोग्राफार्सवर जया बच्चन कायम संताप व्यक्त करताना दिसतात. ज्याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशात जया बच्चन घरात देखील रागात असतात का? असा प्रश्न देखील अनेक चाहत्यांनी उपस्थित केला असता, अभिनेता अभिषेक बच्चन याने आईच्या रागीट स्वभावामागचं सत्य सांगितलं आहे. सध्या सर्वत्र जया बच्चन यांच्या रागीट स्वभावाची चर्चा रंगत आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चन याने आईच्या स्वभावाबद्दल सांगितलं आहे. माझी बिलकूल सक्त नाही. ती एक आई आहे. वडील कायम कामामध्ये व्यस्त असायचे तेव्हा आईने कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही… असं अभिषेक म्हणाला..
अभिषेक लहान असताना महानायक अमिताभ बच्चन कायम शुटिंग किंवा इतर कामांसाठी घराबाहेर असायचे आणि रात्री उशीरा यायचे.. तेव्हा वडिलांसोबत अभिषेक याला वेळ देखील व्यतीत करता येत नव्हता.. पण आशावेळी जया बच्चन यांनी अभिषेक आणि श्वेता यांचा सांभाळ केला.
आराध्या आणि जया बच्चन यांच्या नात्याबद्दल देखील अभिषेक याने मोठी माहिती दिली आहे. ‘दोघींमध्ये फार चांगलं नातं आहे… दोघींमध्ये मैत्रीचं नातं आहे. पण जेव्हा आराध्या कोणत्या अडचणीत असते, तेव्हा सर्वात आधी तिला तिच्या आईची म्हणजे ऐश्वर्या हिची आठवण येते…’ असं देखील अभिषेक नुकताच झालेल्या मुलाखतीत म्हणाला.
अभिषेक याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘घुमर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री सैय्यामी खेर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर आधारलेला आहे. सध्या सर्वत्र अभिषेक बच्चन याच्या सिनेमाची चर्चा रंगत आहे. तर दुसरीकडे जया बच्चन यांचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे.
२८ जुलै रोजी जया बच्चन ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या आहेत. सिनेम बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमा यंदाच्या वर्षातील १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होणारा सहावा हिंदी सिनेमा ठरला आहे.