Abhishek Bachchan | अभिषेक बच्चन कबड्डी संघातून किती कमावतो? खुद्द अभिनेत्यानेच दिलं उत्तर

| Updated on: Aug 18, 2023 | 2:47 PM

डिसेंबर 2022 मध्ये जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटनचा पराभव करून 'प्रो कबड्डी लीग'चं विजेतेपद पटकावलं होतं. या संघाने दुसऱ्यांदा हा विजय मिळवला होता. या टीमने आठ वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावलं होतं.

Abhishek Bachchan | अभिषेक बच्चन कबड्डी संघातून किती कमावतो? खुद्द अभिनेत्यानेच दिलं उत्तर
Abhishek Bachchan
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन, सैयामी खेर आणि शबाना आझमी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘घूमर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिषेकने राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या मुलाखतीत त्याने कब्बडीचा संघ विकत घेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचाही खुलासा केला. त्याने सांगितलं, “माझ्याकडे व्यवसाय करण्याचं कौशल्य कधीच नव्हतं. तरीही खूप मोठी जोखीम पत्करून मी जयपूर पिंक पँथर्सच्या टीममध्ये गुंतवणूक केली. सुदैवाने मला आता त्यातून चांगला परतावा मिळतोय.”

कबड्डी संघात गुंतवणूक करणं म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखं होतं, असं अभिषेक म्हणाला. पण ही जोखीम पत्करून त्याचा फायदाच झाला. कारण त्याच्या कबड्डी संघाचं मूल्य आताच्या घडीला तब्बल 100 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. “मला बिझनेसबद्दल जे काही शिकवलं गेलं, त्यापेक्षा व्यवसायाबाबत माझे निर्णय नेहमीच वेगळे राहिले आहेत. हा बिझनेस कसा चालेल हे आम्हाला माहीत नव्हतं. फक्त गट फिलिंग होती. हा व्यवसाय कसा चालतो, टीम कशी तयार होते, आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी किती खर्च येईल याबद्दल मला आणि निर्माते बंटी वालिया यांना काहीच कल्पना नव्हती. 2014 मध्ये आमचा संघ पहिल्यांदा प्रो कबड्डी लीगमध्ये सहभागी झाला होता”, असं तो पुढे म्हणाला.

जेव्हा त्याला विचारण्यात आलं की जर तुला या बिझनेसबद्दल खात्री नव्हती तरी तुम्ही संघ विकत घेण्याचा विचार कसा केला, तेव्हा तो म्हणाला, “मला फक्त खात्री होती की लोकांना कबड्डीचा सामना पहायला आवडेल. याला तुम्ही गट फिलिंगच म्हणू शकता. जयपूर पिंक पँथर्स संघाचं मूल्य आज 100 कोटींहून अधिक आहे. अगदी कमी पैशात आम्ही सुरू केलेलं काम आज चांगला परतावा देत आहे.”

हे सुद्धा वाचा

कबड्डी संघाच्या बिझनेसमधून आतापर्यंत किती नफा झाला याविषयी अभिषेकने सांगितलं, “मी माझ्या नफ्याबद्दल कधीही बोलत नाही जोपर्यंत मी त्यावर झालेल्या खर्च काढत नाही. परंतु मी म्हणू शकतो की आज माझ्या टीमचं मूल्य 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मात्र इथवर पोहोचायला आम्हाला सुमारे दहा वर्षे लागली.”

डिसेंबर 2022 मध्ये जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटनचा पराभव करून ‘प्रो कबड्डी लीग’चं विजेतेपद पटकावलं होतं. या संघाने दुसऱ्यांदा हा विजय मिळवला होता. या टीमने आठ वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावलं होतं.