ऐश्वर्या राय नाही तर, ‘या’ अभिनेत्रीवर जीवापाड प्रेम करायचा अभिषेक, बच्चन कुटुंबाला देखील ती आवडायची, पण…

| Updated on: Jan 07, 2024 | 2:02 PM

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन आणि एक्स गर्लफ्रेंडचा 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल..., बच्चन कुटुंबाला देखील 'ती' आवडायची, पण..., दोघांचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... आजही रंगते दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा

ऐश्वर्या राय नाही तर, या अभिनेत्रीवर जीवापाड प्रेम करायचा अभिषेक, बच्चन कुटुंबाला देखील ती आवडायची, पण...
Follow us on

मुंबई | 7 जानेवारी 2024 : अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2207 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. पण ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अभिषेक बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रेमात होता. तेव्हा अभिषेक याच्या गर्लफ्रेंडवर बच्चन कुटुंब देखील प्रेम करत होतं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. पूर्वी देखील अभिषेक – करिश्मा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये करिश्मा आणि महानायक अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा मिठी मारताना दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या जुन्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पार्टीमधील दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिषेकची बहीण श्वेताही दिसत आहे. करिश्माची बहीण करीना कपूरही दिसत आहे. श्वेता बच्चन करिश्माला खूप प्रेमाने मिठी मारते आणि अभिषेक जमलेल्या पाहुण्यांसोबत तिची ओळख करून देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी अभिषेकची नजर करिश्मावरून हटताना दिसत नाहीये आणि करिश्मासाठी अभिनेत्याच्या मनात असलेलं प्रेम स्पष्ट दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता हिचं लग्न 1997 मध्ये कपूर कुटुंबाची मुलगी रितू नंदा हिचा मुलगा निखिल हिच्यासोबत निश्चित झालं होतं. या नात्यामुळेच कपूर आणि बच्चन कुटुंब जवळ आले आणि याच दरम्यान अभिषेक आणि करिश्माचीही भेट झाली. भेटीच हळूहळू प्रेम होऊ लागलं. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा बॉलिवूडमध्येच नाही चाहत्यांमध्ये देखील होऊ लागली.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक – करिश्मा यांच्या साखरपुड्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. दोघांचा साखरपुडा देखील झालेला होता. पण लग्न होऊ शकलं नाही. करिश्मा आई बबिता यांना अभिषेक याच्या करियरबद्दल भीती सतावत होती. अभिषेक याचे सिनेमे सतत फ्लॉप ठरत असल्यामुळे दोन्ही कुटुंबातील संबंध खराब झाले आणि अभिषेक – करिश्मा याचं लग्न होऊ शकलं नाही.

अभिषेक यांच्यासोबत लग्न मोडल्यानंतर करिश्मा हिने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. करिश्मा हिला दोन मुलं आहे. घटस्फोटानंतर करिश्मा हिने कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्री ‘सिंगर मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे. तर, अभिषेक याने ऐश्वर्या राय हिच्यासोबतस लग्न. दोघांना एक मुलगी देखील आहे.