अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची मोठी पोलखोल, अभिषेक थेट म्हणाला, रात्री पांघरूणामध्ये…

| Updated on: Jan 23, 2024 | 12:00 PM

बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. आता बिग बॉस 17 चा फिनाले देखील जवळ आलाय. सध्या अभिषेक याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाले आहेत.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची मोठी पोलखोल, अभिषेक थेट म्हणाला, रात्री पांघरूणामध्ये...
Follow us on

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे हे बघायला मिळत आहेत. बिग बॉस 17 चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. बिग बॉस 17 ला अजूनही म्हणावा तसा धमाका टीआरपीमध्ये करता आला नाहीये. बिग बॉस 17 मध्ये अंकिला लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे सहभागी झाले आहेत. मात्र, बिग बॉस 17 च्या घरात आल्यापासून सतत अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यामध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहेत. हेच नाही तर अनेक गंभीर आरोप हे दोघांनी एकमेकांवर केले आहेत. अगदी छोट्या गोष्टींवरूनही यांच्यामध्ये मोठे वाद हे होतात.

आता नुकताच अभिषेक याने अंकिता लोखंडे हिचा खरा चेहरा हा जगासमोर आणलाय. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात नेहमीच भांडणे बघायला मिळतात, विकी जैन हा अंकितावर ओरडतो आणि अंकिता ही रडायला लागते. आता यावरच मोठा खुलासा अभिषेक याने केलाय. अभिषेक याचे हे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले असून अभिषेक बरोबर बोलत असल्याचे म्हटले.

अभिषेक याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये अभिषेक हा अरुणमहाशेट्टी याला म्हणतो की, मुळात काय घडले हे मी तुम्हाला सांगतो…हे लोक (अंकिता लोखंडे आणि विकी जैन) रात्री झोपताना माईक काढून पांघरूणामध्ये एकत्र येतात, त्याचवेळी ते काही गोष्टी ठरवतात आणि त्याप्रमाणे संपूर्ण दिवस वागतात.

विकी जैन आणि अंकिता लोखंडे ठरवतात की, मी असा बोलेल मग तू त्यावर असे बोल. मग या गोष्टीवर आपण दोघे मिळून भांडणे करू. मुळात म्हणजे आता विकी भाईला माहिती आहे की, तो बिग बाॅस जिंकू शकत नाही. मग अंकिताने तरी बिग बाॅस जिंकावे यासाठी या दोघांचे हे सर्व प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना अभिषेक हा दिसतोय.

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अनेकांनी तर थेट म्हटले की, अभिषेक हा अगदी बरोबर बोलत आहे. दररोज यांचे भांडणे कशी होऊ शकतात, हे सर्वकाही ठरवूनच करतात. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होतोय.