अभिषेक कुमार याचा खळबळजनक दावा, ईशा मालवीय हिच्यावर गंभीर आरोप

| Updated on: Oct 30, 2023 | 6:50 PM

बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 चा नुकताच विकेंडचा वार पार पडलाय. यावेळी सलमान खान याने घरातील सदस्यांचा जोरदार क्लास लावल्याचे बघायला मिळाले. अभिषेक कुमार हा मोठा वादात सापडलाय.

अभिषेक कुमार याचा खळबळजनक दावा, ईशा मालवीय हिच्यावर गंभीर आरोप
Follow us on

मुंबई : बिग बॉस 17 हे चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बॉस 17 मध्ये वादग्रस्त स्पर्धेक म्हणून ईशा मालवीय हिचे नाव पुढे येतंय. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 17 मध्ये ईशा हिच्या बाॅयफ्रेंडचे आगमन झाले. समर्थ जुरेल याची एंट्री बिग बाॅसच्या घरात झाल्यानंतर ईशा तणावात दिसून आली. इतकेच नाही तर तिने थेट म्हटले की, समर्थ जुरेल हा फक्त तिचा मित्र आहे. मात्र, त्यानंतर तिने मान्य केले की, ती समर्थ याला डेट करतंय.

विशेष म्हणजे अगोदर बिग बॉस 17 मध्ये ईशा हिचा एक्स बाॅयफ्रेंड अभिषेक कुमार हा घरात आहे. समर्थ जुरेल आणि अभिषेक यांच्यामध्ये घरात मोठा हंगामा हा बघायला मिळाला. आता नुकताच अभिषेक याने ईशावर अत्यंत गंभीर आरोप केले. अभिषेक विकी जैन याच्यासोबत बोलताना दिसला. ईशा मुलांचा वापर करते असे म्हणताना अभिषेक दिसला.

अभिषेक म्हणाला की, उडारिया मालिकेच्या सेटवर माझ्या अगोदर एका दुसऱ्या मुलाला ईशा डेट करत होती. त्यांचे रिलेशन तीन महिने टिकले. मुळात म्हणजे ईशा हिला वेगवेगळ्या मुलांसोबत फिरायला जायला आवडते जे मला अजिबातच आवडत नाही. त्या सेटवरील मुलाला डेट केल्यानंतर तिने मला डेट केले. आता माझ्यानंतर ती समर्थ जुरेल याला डेट करतंय.

पुढे अभिषेक हा थेट ईशा हिच्या आईबद्दल बोलताना देखील दिसला. अभिषेक म्हणाला की, ईशा हिच्या आईला मी अगोदरपासून अजिबातच आवडत नव्हतो. तिच्या आईला देखील पार्टी करायला प्रचंड आवडतात. अभिषेक याचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले. या वादामध्ये अभिषेक याने ईशाच्या आईला आणल्याने तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय.

बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे हे होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यामध्ये मोठा वाद झालाय. विकी जैन याने मजाकमध्ये ऐश्वर्या हिच्याबद्दल असे काही बोलला की, तिचा चांगलाच पारा चढला. यानंतर ऐश्वर्या शर्मा आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठा वाद बघायला मिळाला.