अगोदर रोमान्स, त्यानंतर गंभीर आरोप, आता थेट म्हटले बहीण, अभिषेक कुमार आणि खानजादी यांच्यात मोठा हंगामा

| Updated on: Nov 17, 2023 | 2:23 PM

बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे हे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक क्रेझ नक्कीच आहे. बिग बॉस 17 ची चाहते हे आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यात वाद होत असून गंभीर आरोप अंकिता हिने विकी जैन याच्यावर केले.

अगोदर रोमान्स, त्यानंतर गंभीर आरोप, आता थेट म्हटले बहीण, अभिषेक कुमार आणि खानजादी यांच्यात मोठा हंगामा
Follow us on

मुंबई : बिग बॉस 17 मध्ये खतरनाक हंगामा होताना दिसतंय. नुकताच बिग बॉस 17 मध्ये दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीमध्ये खास पापाराझी हे देखील उपस्थित होते. घरातील सदस्य हे पापाराझी यांना खास पोझ देताना दिसले. दिवाळी पार्टी आणि घरात मोठे धमाके होणार नाहीत, हे तर शक्यच नाही. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांना एक खास गेम दिला. यामध्ये ज्या सदस्याकडे घरातील सदस्याचे फोटो असलेले कार्ड येईल, त्यांच्यावर टीका करायची होती. पहिल्या फेरीमध्ये मनारा चोप्रा ही विजेती ठरली.

दुसऱ्या फेरीमध्ये अंकिता लोखंडे ही विजेती ठरली. खरी मजा ही तेंव्हा येते, ज्यावेळी अभिषेक कुमार याच्याकडे खानजादी हिचे कार्ड येते. मग काय अभिषेक कुमार या आपल्या मनातील सर्व भडास घरातील सदस्यांसोबत काढताना दिसतो. इतकेच नाही तर अभिषेक याचे बोलणे ऐकून थेट ढसाढसा रडताना खानजादी ही दिसत आहे. यामुळे घरात मोठा हंगामा झाला.

अभिषेक कुमार हा थेट खानजादी हिला म्हणतो की, एका टास्कसाठी आणि गिफ्टसाठी हिने माझ्या भावनांसोबत खेळले आहे. असे 50 गिफ्ट हॅम्पर मी हिला आणून दिले असते. इतकेच नाही तर अभिषेक थेट म्हणतो की, माझ्यासोबत ही जे काही रिलेशन दाखवत आहे ते फक्त फक्त या गेममध्ये राहण्यासाठी आणि कॅमेऱ्यासाठी करत आहे.

जेंव्हा आम्ही दोघे रोमॅंटिक होतो, त्यावेळी हिची नजर ही फक्त कॅमेऱ्याकडेच असते. हेच नाही तर ज्यावेळी आम्ही एकमेंकांच्या जवळ येते होते, तेंव्हा हिने हे गेमसाठी करत असल्याचे म्हटले. अरे बहीण…, अभिषेक याने खानजादी हिला बहीण म्हणताच घरातील सदस्य थेट ओरडायला लागतात. अभिषेक याने खानजादी हिचा खरा चेहरा घरातील सदस्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला.

अमिषेक कुमार याचे हे बोलणे ऐकून खानजादी ही थेट ढसाढसा रडताना दिसली आहे. यानंतर अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे खानजादी हिला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, खानजादी ही रडताना दिसत आहे. आता पुढे काही मोठे खुलासे हे होताना दिसत आहेत. मात्र, अभिषेक कुमार याने केलेला हा खुलासा ऐकून घरातील इतर सदस्य हे हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.