मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कायमच आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात. मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरूवात केली. अर्जुन कपूर आणि मलायका सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना देखील दिसतात. अर्जुन कपूर आणि मलायका काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. मध्यंतरी एक चर्चा होती की, अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई लवकरच मलायका अरोरा होईल, त्यानंतर अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठा संताप व्यक्त केला होता.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा कधी लग्न करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आता अर्जुन कपूर आणि मलायका यांच्या लग्नावर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीतरी भाष्य केले आहे. अनिल कपूर हे सध्या बिग बॉस ओटीटी 2 ला होस्ट करताना दिसत आहेत. कालच बिग बॉस ओटीटीचा प्रीमियर झालाय.
अनिल कपूर यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अनिल कपूर हे आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसले. हेच नाही तर अनिल कपूर म्हणाले की, बोनी कपूर हे कोणत्याही कार्यक्रमाला उशीरा येणारे सदस्य आमच्या घरातील आहेत. यावेळी अनिल कपूर यांना मोठा प्रश्न विचारण्यात आला. विशेष म्हणजे त्याचेही उत्तर अनिल कपूर यांनी दिले आहे.
अनिल कपूर यांना विचारण्यात आले की, कपूर खानदानामध्ये आता कोणाचे लग्न सर्वात अगोदर होणार आहे. यावर अनिल कपूर हे म्हणाले की, अर्जुन कपूर याचे लग्न अगोदर होईल. म्हणजेच आता लवकरच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे लग्न होईल. अनिल कपूर यांनी लग्नाबद्दल मोठी हिंटच देऊन टाकलीये.
मलायका अरोरा ही 50 वर्षाची आहे तर अर्जुन कपूर हा 38 वर्षाचा आहे. दोघांच्या वयामध्ये 12 वर्षाचा अंतर आहे. शिवाय मलायका अरोरा हिला एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव अरहान खान आहे. अर्जुन कपूर याचे लग्न सर्वात अगोदर होईल, असे अनिल कपूर यांनी म्हटले. मात्र, मलायका अरोरा की, इतर कोणासोबत अर्जुन लग्न करणार यावर अनिल कपूर यांनी भाष्य केले नाहीये.