चंकी पांडेने एक मोठा काळ गाजवला आहे. चंकी पांडेने चित्रपटात धमाकेदार भूमिका केल्या आहेत. हेच नाही तर आता चंकी पांडेनंतर त्याची लेक अनन्या पांडे ही देखील बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसत आहे. चंकी पांडे याने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. विशेष म्हणजे चंकी पांडे याने हा खुलासा चक्क सलमान खान याच्याबद्दल केला आहे. चंकी पांडे याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. काही दिवसांपूर्वीच मुलीबद्दल मोठा खुलासा चंकी पांडेकडून करण्यात आला. अनन्याने काय करावे आणि काय नाही हे तिचा प्रश्न असल्याचे थेट म्हणताना चंकी पांडे दिसला.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये चंकी पांडेने म्हटले की, मी आणि सलमान खान दक्षिण अफ्रिकेला चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो. त्यावेळी मी सलमान खान याला म्हटले की, चल मी तुला एक जिन्स घेऊन देतो. मग त्यानंतर आम्ही एका मॉलमध्ये गेलो. जिन्स फ्रीमध्ये मिळत असल्याने सलमान खान माझ्यासोबत येण्यास तयार झाला.
बाकी काहीही सलमान खान याला माहिती नव्हते. ज्या दुकानात मी सलमान खान याला जिन्स घेऊन देण्यासाठी गेलो होतो त्या दुकानदाराकडून मी सलमान खान याला तिथे आणण्यासाठी 50,000 डॉलर घेतले होते. याबद्दल काहीच कल्पना सलमान खानला नव्हती, असे थेट चंकी पांडे याने म्हटले. सलमान खानला अंधारात ठेऊन चंकी पांडेने ही डील केली होती.
स्मार्ट बिजनेसमॅन असल्याचे सांगताना चंकी पांडे हा दिसला. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा होती की, अनन्या पांडे ही अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत आहे. हेच नाही तर यांचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसले. मात्र, दोघांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल काहीच भाष्य हे केले नाही.
यावर काही दिवसांपूर्वीच चंकी पांडेला विचारण्यात आले. यावर बोलताना चंकी पांडे म्हणाला की, अनन्या पांडे ही तिचे निर्णय घेऊ शकते. हेच नाही तर अनन्या माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते. यामुळे मी तिला काय बोलणार ना? काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिने मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असा फ्लॅट खरेदी केला. या फ्लॅटचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अनन्या पांडे ही दिसली.