मुंबई : अखेर अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली. त्यानंतर टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, साहेबांसमोर खरा माणूसच बसू शकतो, खोटा नाही…अशी सूचक प्रतिक्रियाही दिली. माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्यामुळे त्याची राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातही जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमके प्रकरण काय?
अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांना व्यावसायिक कारणातून काढल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. मात्र, सोशल मीडयावर वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहे. लोकांनी माने यांना पाठिंबा दर्शवला असून भाजपवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे माने यांनी दोन ओळींची फेसबुक पोस्ट टाकत माघार घेणार नाही तर लढत राहीन असे सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी “काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा…गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा,” असे म्हणत मते व्यक्त करतच राहणार अशी भूमिका घेतली आहे.
पवारांशी काय झाली चर्चा?
अभिनेते माने यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेची टीव्ही 9 मराठीला माहिती देताना ते म्हणाले की, राजकीय भूमिका आणि महिलेने केलेली तक्रार दोन्ही विषयी मी पवारांशी बोललो. राजकीय भूमिकेविषयीची माझी सगळी डाक्युमेंट त्यांना दाखवली. त्याच्यावर चार-पाच दिवस आलेल्या धमक्या. तुला काढून टाकतो वगैरे ते सगळं दाखवल्याचं त्यांनी सांगितलं.
माने म्हणाले की, आपल्याला एका महिलेने केलेला आरोप म्हटलं की धक्का बसतो, पण तसं इथं काहीही नाहीय. त्यांच्या तक्रारीसंबंधीचीही माझी काही डाक्युमेंट आहेत. ती सुद्धा मी शरद पवारांकडे सादर केली. माझी बाजू मांडून दाखवली. त्यांनी शांतपणे ऐकुण घेतले. बघू, आता ते काय करतायत याच्यावर, असे ते म्हणाले. यावर शरद पवारांची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न विचाल्यानंतर ते म्हणाले की, प्रतिक्रिया लगेच देतात ते लोक उथळ असतात. साहेब तसे नाहीयत. त्यांच्यासोबत खरा माणूसच बसू शकतो. खोटा नाही, असा दावाही त्यांनी केला.
Nashik | दिक्काल धुक्याच्या वेळी, प्राणांवर नभ धरणारे; कोविड अनाथांवर प्रशासनाच्या मायेची पाखर!
Nashik | निवडणुकीत तेरावा; 159 झोपडपट्ट्या नियमित करण्यासाठी सर्वपक्षीय खटाटोप, पुढे काय होणार?
Nashik ZP| झेडपी निवडणूक लांबणीवर पडणार; पण मुदतवाढ न मिळता प्रशासक येण्याचे संकेत, कारण काय?