Gadar 2 Villain | एका व्हिडीओमुळे अवघ्या 3 मिनिटांमध्येच फायनल झाले ‘गदर 2’साठी मनीष वाधवा, जबरदस्त असा…

| Updated on: Aug 13, 2023 | 6:33 PM

सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक चित्रपटाचे काैतुक करताना दिसत आहेत. थिएटर बाहेर देखील मोठी गर्दी प्रेक्षकांनी केलीये. शेवटी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला गदर 2 हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी करण्यास सुरूवात केली आहे.

Gadar 2 Villain | एका व्हिडीओमुळे अवघ्या 3 मिनिटांमध्येच फायनल झाले गदर 2साठी मनीष वाधवा, जबरदस्त असा...
Manish Wadhwa
Follow us on

मुंबई : सध्या बाॅक्स आॅफिसवर सनी देओल याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे नक्कीच बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी गदर 2 चित्रपटाने धमाका केला आणि जोरदार कमाई केली. निर्मात्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाची वाट लोक 22 वर्षांपासून बघत होते. सनी देओल (Sunny Deol) आणि चित्रपटाच्या टिमने गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले आहे.

गदर 2 चित्रपटामध्ये सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा हे मुख्य भूमिकेत आहेत. गदर 2 चित्रपटाच्या अभिनयासाठी अजून एका व्यक्तीचे सतत काैतुक केले जात आहे. गदर 2 चित्रपटामध्ये पाकिस्तानी सेनेचे जनरल हामिद इकबालची भूमिका मनीष वाधवाने साकारली आहे. विशेष म्हणजे मनीष वाधवाच्या भूमिकेचे देखील काैतुक केले जात आहे.

मनीष वाधवा याला गदर 2 चित्रपटामध्ये अवघ्या तीन मिनिटांमध्ये घेतले होते. एक व्हिडीओ पाहून त्याला लगेचच चित्रपटामध्ये साईन करण्यात आले. अनिल शर्मा यांना अगोदर भारतातील गदर 2 चे शूटिंग पूर्ण करून घेतले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानचा भाग शूट करायचा होता. मात्र, त्यांना हामिद इकबालच्या भूमिकेसाठी हवा तसा अभिनेता भेटत नव्हता. जो सनी देओल याचा टक्कर देऊ शकेल.

मनीष वाधवा यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे केले आहेत. मनीष वाधवा म्हणाले की, अनिल शर्मा यांना खलनायकाच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांच्यासारखा व्यक्ती हवा होता. मी नक्कीच अमरीश पुरी यांच्या इतका चांगला नाहीये. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहचू शकतो हिच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

विशेष म्हणजे हमिद इकबालच्या भूमिकेसाठी फक्त 3 मिनिटांमध्ये मनीष वाधवाला फायनल करण्यात आले. एक छोटीशी लुक टेस्ट करण्यात आली. ‘गदर 2’ मधील खलनायकाची भूमिका त्याच्याकडे गेली. मुळात म्हणजे गदर 2 चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आता पुढील काही दिवसांमध्ये कमाईत हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.