नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. ईडीने चौकशीसाठी प्रकाश राज यांना 10 दिवसांत हजर राहण्यासाठी सांगितलं आहे. ईडीने समन्स बजावल्यामुळे प्रकाश राज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. 100 कोटी रुपयांच्या प्रकरणी प्रकाश राज यांचं नाव समोर आलं आहे. प्रकरण प्रणव ज्वेलर्सशी संबंधीत आहे. प्रणव ज्वेलर्स मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं प्रकाश राज यांना समन्स बजावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॉन्झी स्कीम घोटाळ्याप्रकरणी, ईडीने तमिळनाडूच्या त्रिची येथील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्सवर छापे टाकले होते.
प्रकाश राज प्रणव ज्वेलर्सचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहेत. छापेमारीनंतर प्रकाश राज यांच्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. काही व्यक्तींद्वारे चालवण्यात येणाऱ्या पॉन्झी स्कीम प्रकरणात प्रणव ज्वेलर्सचं देखील नाव समोर आलं आहे. तपासादरम्यान ईडीने काही कागदपत्र, 23.70 लाख रुपयांची रक्कम आणि काही दागिने जप्त केले आहेत..
ED summons actor Prakash Raj for questioning in ponzi scam-linked money laundering case against Trichy-based jewellery group: Officials
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2023
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत ईडीला अनेक कागदपत्रे सापडली होती ज्यातून काही संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाली असल्याचं देखील समोर येत आहे. त्रिचीच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या माहिती अहवालानंतर ईडीने तपास सुरु केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव ज्वेलर्सने उच्च परतावा देण्याचं आश्वासन देऊन 100 कोटी रुपये सामान्य जनतेकडून घेतले. यासाठी काही लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणून केली. पण प्रणव ज्वेलर्स आणि इतर संबंधीत व्यक्ती सामान्य जनतेचे पैसे परत करण्यात असमर्थ ठरले. त्यांनी सामान्य जनतेची दिशाभूल केली आणि शोरुम रात्रीत बंद केलं…
मिळालेल्या माहितीनुसार, इरोड, नागरकोइल, मदुराई, कुंभकोणम आणि पुद्दुचेरीसह चेन्नई येथील प्रणव ज्वेलर्सच्या शोरूममध्ये पॉन्झी स्कीम सुरु करण्यात आली. यामध्ये अनेक लोकांनी पैसे गुंतवले. पण त्यांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी प्रकाश राज यांचं नाव देखील समोर आलं आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.