मुंबई : प्रख्यात अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्डच्या नावे महेश मांजरेकर यांच्याकडे 35 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. (Actor Producer Mahesh Manjarekar gets threat call by name of underworld of 35 crore ransom)
मांजरेकर यांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेज पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अबू सालेम टोळीकडून महेश मांजरेकर यांना धमकी आल्याची माहिती आहे. मांजरेकर यांना रविवारी धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. रत्नागिरीतील खेड येथून 32 वर्षाच्या युवकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
#Correction Director & actor Mahesh Manjrekar received an extortion* call from a person, in the name of underworld don Abu Salem. Anti-extortion cell has arrested an accused, who was trying to extort Rs 35 crore through the threat call: Mumbai Police
— ANI (@ANI) August 27, 2020
महेश मांजरेकर यांनी वास्तव, काटे, हत्यार यासारख्या अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय अस्तित्व, विरुद्ध, मातीच्या चुली, लालबाग परळ, काकस्पर्श, नटसम्राट अशा अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा : मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघात फूट, नव्या संघटनेची स्थापना; खोपकर, मांजरेकर, दामले पदाधिकारी
बॉडीगार्ड, रेगे, बाजीराव मस्तानी, जय हो, साहो, मुळशी पॅटर्न अशा अनेक सिनेमात ते झळकले आहेत. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वाचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. त्यांची अनोखी स्टाईल प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 27 August 2020 https://t.co/TOikdzGRKQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2020