Rajpal Yadav property : राजपाल यादवची करोडोंची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव आपल्या हास्यामुळे चर्चेत आहे. जेव्हा-जेव्हा राजपाल यादवचे नाव घेतले जाते तेव्हा त्याचे मजेदार संवाद आणि त्याचे विनोद चाहत्यांना भरपूर हसवतात. अलीकडेच राजपाल यादवबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. राजपाल यादव याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. राजपाल यादवची ही संपत्ती उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये आहे. बँकेने त्याची करोडोंची संपत्ती जप्त केली आहे. अभिनेत्याने वेळेवर कर्जाची रक्कम न भरल्याने ही जागा जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राजपाल यादवने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स शाखेतून मोठे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात राजपाल यादवने वडील नौरंग यादव यांच्या नावावर जमीन बँकेत हमी म्हणून ठेवली होती, मात्र ही रक्कम न भरल्याने अभिनेत्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
राजपाल यादवची ही जमीन शाहजहानपूरच्या पॉश भागात आहे. वेळेवर रक्कम जमा करू न शकल्यामुळे बँकेने 2 दिवसांपूर्वी शाहजहांपूरची त्याची संपत्ती जप्त केली होती.
मुंबई शाखेने या जागेला टाळे ठोकल्याचेही बोलले जात आहे. ‘बँकेची मालमत्ता’ असे बॅनरही त्यांनी लावले आहे. याशिवाय बँक राजपाल यादववर कठोर कारवाईही करू शकते, असे मानले जात आहे. हे पैसे वेळेवर जमा न केल्यास अभिनेत्याला तुरुंगात जावे लागू शकते, असे मानले जात आहे.
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवचं हे प्रकरण 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लपता’ या चित्रपटाशी संबंधित आहे. हा चित्रपट राजपाल यादवने दिग्दर्शित केला होता तर त्याची पत्नी राधा यादव या सिनेमाची निर्माती होती. या सिनेमासाठी त्याने ५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. जे त्याला फेडता आलेलं नाही. त्यामुळे बँकेने त्यांने गहान ठेवलेली जागा जप्त केली आहे.
याआधी 2018 मध्ये याचप्रकरणात राजपाल यादवला 3 महिने तुरुंगात जावे लागले होते. दिल्लीस्थित कंपनी मुरली प्रोजेक्ट्सने राजपाल यादव यांच्या कंपनी श्री नौरंग गोदावरी एंटरटेनमेंटविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला होता. राजकुमार यांनी 2010 मध्ये हे कर्ज घेतले होते.