रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल 2023 रोजी लग्न केले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. हेच नाहीतर लग्नाच्या काही दिवसांमध्ये आलिया भट्ट हिने राहा हिला जन्म दिला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचेही अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. रणबीर कपूर याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आलिया भट्ट हिचे देखील एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही आलिया भट्ट ही चांगलीच सक्रिय दिसते.
विशेष म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघेही अत्यंत मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. रणबीर कपूर याच्याकडे आलिया भट्ट हिच्यापेक्षाही अधिक संपत्ती आहे. रणबीर कपूर याच्याकडे 345 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये रणबीर कपूर याच्याकडे अत्यंत महागड्या गाड्या आहेत. एका चित्रपटासाठी 50 कोटीपर्यंत फीस रणबीर कपूर हा घेतो.
रणबीर कपूर याच्याकडे Rolls Royce, Mercedes Benz GL, Range Rover, Audi RS7 अशा अनेक महागड्या गाड्या आहेत. यासोबतच रणबीर कपूर याच्याकडे बांद्रामध्ये 4 BHK फ्लॅट देखील आहे, ज्याची किंमत तब्बल 35 कोटी आहे. रणबीर कपूरच्या एकूण संपत्तीमध्ये दरवर्षी 40 टक्क्यांनी वाढत होत आहे.
दुसरीकडे आलिया भट्ट हिची 299 कोटी संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी आलिया भट्ट ही 20 लाख रूपये फीस घेते. हेच नाहीतर आलिया भट्ट ही चित्रपटाचे प्रोडेक्शन देखील चालवते. यामधून ती मोठी कमाई देखील करते. आलिया भट्टचे मुंबईमध्ये 32 कोटींचे घर आहे. लंडनमध्येही आलियाचे 25 कोटींचे घर आहे.
आलियाकडे महागड्या गाड्यांचेही मोठे कलेक्शन आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे मोठी कमाई करतात. आलिया भट्ट हिचे चित्रपट काही दिवसांपासून चांगलाच धमाका करताना देखील दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर, आलिया भट्ट, नीतू कपूर आणि राहा हे एकत्र स्पॉट झाले होते.