मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरात रवींद्र महाजनी हे मृतावस्थेत आढळले. धक्कादायक म्हणजे तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील किरायाच्या घरात ते एकटेच राहत होते. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर आता अनेक चर्चांना उधाण आले असून रवींद्र महाजनी हे एकटेच का राहत होते हा प्रश्न उपस्थित केला जातोय. रवींद्र महाजनी यांचा मुलगा मोठा स्टार असतानाही आपल्या वडिलांना एकटा का राहण्यास ठेवत होता असेही अनेकांनी विचारले आहे. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू (Death) दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.
रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकारांनी तळेगावकडे धाव घेतली. रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी तब्बल दोन ते तीन दिवसांनंतर कळल्याने सर्वांनाच धक्का बसलाय. रवींद्र महाजनी हे त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात नव्हते का असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण अचानक दुर्गंधी येत असल्याने रहिवाशांनी याची माहिती पोलिसांना दिली होती.
नुकताच अभिनेते रवींद्र महाजनी हे अनंतात विलीन झाले आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे करण्यात आले आहेत. रवींद्र महाजनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी अभिनेता प्रविण तरडे हे उपस्थित होते. रवींद्र महाजनी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी ही केली होती.
रवींद्र महाजनी यांच्या निधनाची माहिती कळताच अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. रवींद्र महाजनी यांनी अभिनयासोबतच चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. 1997 मध्ये रवींद्र महाजनी यांनी ‘सत्ते पिशनी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.
रवींद्र महाजनी यांनी 1969 अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील चित्रपटामध्ये काम केले. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याने नुकताच इमली मालिकेत धडाकेबाज भूमिका केलीये. मात्र, वडिलांचा मृत्यू होऊन दोन ते तीन त्यांच्या कुटुंबियांना कसे कळाले नाही, यावर चर्चा सुरू आहे.