अभिनेता समर्थ जुरेल हा नेहमीच चर्चेत असतो. गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री ईशा मालवीय हिला सपोर्ट करण्यासाठी समर्थ हा बिग बाॅसच्या घरात देखील दाखल झाला होता. बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यापासून समर्थ जुरेल हा तूफान चर्चेत आहे. समर्थ जुरेल हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो. समर्थ जुरेल याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. समर्थ जुरेल हा बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून त्याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये. नुकताच समर्थ जुरेल याच्यावर चाहते संतापले आहेत.
समर्थ जुरेल याने 1 एप्रिलला त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला. हा फोटो पाहून त्याचे चाहते हे चांगलेच चिंतेत आल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर समर्थ जुरेल याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना देखील चाहते दिसले. समर्थ जुरेल याचा फोटो पाहून विविध चर्चा रंगताना दिसल्या. हा फोटो तूफान व्हायरल होताना दिसला.
समर्थ जुरेल याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो दवाखान्यात दिसत होता हेच नाही तर त्याला ऑक्सिजन मास्क लावल्याचे देखील फोटोमध्ये दिसत होते. काही वेळामध्येच समर्थ जुरेल याने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावरून डिलीट केला. परंतू तोपर्यंत समर्थ जुरेल याचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होताना दिसला.
समर्थ जुरेल याने नंतर स्पष्ट केले की, तो फक्त चाहत्यांना एप्रिल फुल करत होता आणि मजाक करत होता. मात्र, समर्थ जुरेल याच्यावर चाहते संताप व्यक्त करताना दिसत आहेत. लोक सतत समर्थ जुरेल याला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसत आहेत. हेच नाही तर एकाने मुलांमधला पूनम पांडे समर्थ जुरेल याला म्हटले आहे. लोकांचा संताप वाढताना दिसतोय.
समर्थ जुरेल याला दवाखान्यातील फेक फोटो शेअर करणे चांगलेच महागात पडल्याचे बघायला मिळतंय. समर्थ जुरेल याने म्हटले की, मी फक्त एक मजाक म्हणून तो फोटो शेअर केला होता. चाहत्यांची मने दुखवण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. अजूनही लोक हे सतत समर्थ जुरेल याला सोशल मीडियावर खडेबोल सुनावताना दिसत आहेत.