आज बाळासाहेब ठाकरे हवे होते… प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे अचानक असं का म्हणाले?, ट्विटची का होतेय चर्चा

| Updated on: Jul 10, 2024 | 9:34 AM

आज बाळासाहेब ठाकरे हवे होते... प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य, पण अभिनेते असं अचानक का म्हणाले? 'त्या' ट्विट आणि व्हिडीओची होत आहे चर्चा..., सध्या सर्वत्र सयाजी शिंदे यांच्याकडून मांडण्यात आलेल्या विषयाची चर्चा...

आज बाळासाहेब ठाकरे हवे होते... प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे अचानक असं का म्हणाले?, ट्विटची का होतेय चर्चा
Follow us on

आतापर्यंत अनेक विषयांसाठी आमरण उपोषणाची घोषणा करत आंदोलक आंदोलनाला बसले आहेत. पण पत्रकारांसाठी कधी कोणतं आंदोलन करण्यात आलं असं पाहायला किंवा ऐकायला आलं नाही. पण आता मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या माई शितल करदेकर आमरण उपोषणाला बसणार आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर शितल करदेकर 10 जुलै 2024 म्हणजे बुधवारी आमरण उपोषणाला बसणार आहेत. लोकशाहीच्या चौथ्य स्तंभासाठी सर्वांनी सहभागी व्हा!!! असं आवाहन देखील शितल करदेकर यांनी केलं आहे. शिवाय शितल करदेकर यांनी घेतलेल्या पुढाकाराला अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. शिंदे यांचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

शितल करदेकर यांनी एक्स (ट्विटरवर) सयाजी शिंदे यांचा एक व्हिडीओ आणि एक पोस्टर पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या माध्यमकर्मींसाठी कल्याणकारी महामंडळ असायला हवे. मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या माई शितल करदेकर आमरण उपोषणाला बसत आहेत. सरकारने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी. आमचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे.. असं देखील सयाजी शिंदे म्हणाले आहेत. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

व्हिडीओ आणि पोस्टर एक्स पोस्ट करत शितल करदेकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्राचे दयावान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतिहास घडेल! आमच्या या क्रांतीचे रक्षक व्हा! दानशूर अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्पातला १₹ पत्रकार हितासाठी काढून ठेवा! आज मा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते… जय भवानी जय शिवराय… सध्या शितल करदेकर यांचं ट्विट सर्वत्र व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत शितल करदेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांना टॅग देखील केलं आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेणार पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.