महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान सुरु आहे, सामान्यांपासून ते राजकारणी, सेलिब्रेटी सर्वच आपाला मतदानाचा हक्क बजावत आहे. एवढच नाही तर त्याबद्दल त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टही करत आहे. पण यामध्ये सर्वात व्हायरल झालेली पोस्ट म्हणजे अभिनेता शशांक केतकर याची.
शशांक नेहमीच सोशल मीडियावरून अनेक सामाजिक मुद्द्यांवर, रस्त्यांवर बोलत आपली मत मांडत असतो. तसेच तो काहीवेळेला राजकारणानरही त्याचे मत मांडत असतो. शशांकने आजही मतदान केल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने अधिकृत भारतीय जनतेचा जाहीरनामा लिहिला आहे.
शशांक केतकरची खरमरीत पोस्ट
हा फोटो शेअर करत शशांकने लिहिलं आहे, “मी माझा हक्क बजावला आहे. अधिकृत भारतीय असल्याला मला अभिमान आहे. राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला असला तरी उज्ज्वल भविष्याची आणि उत्तम हिंदुस्थानाची अपेक्षा आहे. मत देऊन असे गप्प बसू नका…चांगल्या कामाचं कौतुक करा आणि चुकांचा निषेध करा…इथून पुढे राज्यकर्त्यांचा नाही, तर आपला जनतेचा कॉमन मिनिमम प्रोग्राम, मॅनिफेस्टो असेल…पिढी बदलतं आहे, सजग होतं आहे… तुम्ही राजकारणाची पद्धत बदला.”
तसेच त्याने फोटोवर लिहिले आहे ,” राजकारण्यांसारखा प्रत्येकाकडे भरपूर पैसा, राजकारण्यांसारख्या प्रत्येकाकडे गाड्या, राजकारण्यांसारखी प्रत्येकाची मोठी घर…भारताची लोकसंख्या बघता शुद्ध हवा, शांतता, स्वच्छ परिसर, पाणी, खड्डे नसलेले मोठे रस्ते, शिक्षणाच्या उत्तम सोयी, उत्तम इस्पितळं, बागा, सुरक्षित समाज, शून्य भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समान हक्का, हाताला काम…2025 उजाडणार आहे. निदान या सामान्य गोष्टी तरी मिळू दे”
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त
असं लिहितं शशांकने सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीवर आपली नाराजी व्यक्त करत आपलं मत मांडलं आहे. तसेच त्याने चाहत्यांना देखील मतदान करण्याच आवाहन केलं आहे. पण नेहमीप्रमाणे शशांकची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनीसुद्धा त्याचा मुद्दा बरोबर आहे असं म्हणत त्याला पाठिंबा दर्शवला आहे.
राज्यातील 288 विधानसभेच्या जागांवर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहेत. आज सकाळपासून मराठी कलाकार मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.