सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले होते. हे फोटो तिच्या लग्नातील होते. सोनाक्षी सिन्हाने हे फोटो शेअर करत लिहिले होते की, तिला तिच्या घरच्यांची खूप जास्त आठवण येत आहे. शिवाय तिने म्हटले की, आज रविवारी घरी सिंधी कढी बनली असावी. सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत 23 जून 2024 रोजी लग्न केले आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी एकमेकांना सात वर्षे डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नानंतर खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार देखील पोहोचले. सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या पार्टीत धमाका करताना दिसली. हेच नाहीतर लग्नामध्ये सही करताना सोनाक्षी सिन्हाने तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात पकडला होता, शेजारी तिची आई देखील उभी होती.
सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला आता 14 दिवस पूर्ण झाली आहेत. सोनाक्षी सिन्हा हिचा पती झहीर इक्बाल याने अत्यंत खास असा फोटो शेअर केलाय. झहीर इक्बाल याने इंस्टाग्राम स्टोरीवर तो फोटो शेअर केलाय. यावेळी झहीर इक्बाल याने सोनाक्षीच्या नावाबद्दल मोठा खुलासा केलाय. अखेर झहीर इक्बालने सांगितले की, प्रेमाने तो सोनाक्षीला अखेर काय म्हणतो.
काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हा हिने लग्नातील एक सुंदर फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर 11.11 असे लिहिले होते. त्याचा अर्थ असा होतो की, यावेळी तुम्ही एखाद्यी गोष्ट मागितली की, ती तुम्हाला मिळते. सोनाक्षीने झहीर इक्बाल याला मागितले होते. झहीर इक्बाल याने हा फोटो रिशेअर करत लिहिले की, हा तू Angel आहेस.
फोटोमध्ये जी दिसत आहे ती माझा फरिश्ता आहे आणि मी तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो. यासोबतच झहीर इक्बाल याने इमोजीही शेअर केला आहे. Angel झहीर इक्बाल हा सोनाक्षीला प्रेमाने म्हणतो. सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग देखील बघायला मिळते.