Gadar 2 | ‘गदर 2’च्या कलाकारांमधील वाद मिटेना, अमीषा पटेल हिला सडेतोड उत्तर देताना दिसला उत्कर्ष शर्मा

| Updated on: Oct 04, 2023 | 3:48 PM

सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 चित्रपटाने तगडी कमाई केलीये. गदर 2 चित्रपटाबद्दल एक मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले.

Gadar 2 | गदर 2च्या कलाकारांमधील वाद मिटेना, अमीषा पटेल हिला सडेतोड उत्तर देताना दिसला उत्कर्ष शर्मा
Follow us on

मुंबई : गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 (Gadar 2)  चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही चाहत्यांमध्ये बघायला मिळाली. गदर चित्रपट तब्बल 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष बाब म्हणजे प्रेक्षकांमध्ये परत तोच उत्साह बघायला मिळाला. गदर 2 चित्रपट (Movie) रिलीज झाल्यानंतर लोकांनी थिएटर बाहेर मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे हे बऱ्याच वर्षांनी बघायला मिळाली की, लोकांनी बाॅलिवूड चित्रपट पाहण्यासाठी इतकी जास्त गर्दी केली. गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल दिसला.

गदर 2 चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल हे मुख्य भूमिकेत दिसले. गदर 2 हा चित्रपट 60 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालाय. चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तब्बल 600 कोटींपेक्षाही अधिक कलेक्शन केलंय. म्हणजेच काय तर गदर 2 हा चित्रपट सुपरहिट नक्कीच ठरलाय. गदर 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.

गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल याने मुंबईमध्ये खास पार्टीचे आयोजन केले. या पार्टीला बाॅलिवूडचे कलाकार मोठ्या प्रमाणात उपस्थित दिसले. इतकेच नाही तर शाहरूख खान हा देखील मागील वाद विसरून गदर 2च्या सक्सेस पार्टीमध्ये पत्नी गाैरी खान हिच्यासोबत पोहचला. या पार्टीतील अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसले.

गदर 2 चित्रपटामुळे सध्या अमीषा पटेल ही तूफान चर्चेत आहे. अमीषा पटेल हिने गदर 2 चे निर्देशक अनिल शर्मा यांच्यावर टिका केली. यानंतर अनिल शर्मा यांनीही अमीषा पटेल हिच्या टिकेला उत्तर देत तिने केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असल्याचे थेट म्हटले. यानंतर आता अमीषा पटेल हिने उत्कर्ष शर्मा यांच्यावर निशाणा साधला.

अमीषा पटेल हिने म्हटले की, अनिल शर्मा त्याच्या चित्रपटातून आपल्या मुलाला पुढे घेऊन जात आहेत. आता अमीषा पटेल हिच्या याच विधानावर उत्कर्ष शर्मा याने चांगलाच समाचार घेतलाय. उत्कर्ष शर्मा म्हणाला, मुळात म्हणजे मला हेच कळत नाहीये की, अमीषा पटेल हे सर्व का बोलत आहेत. मला याची काही कल्पना नाही.

मुळात म्हणजे मला कोणतीही अडचण नाही आणि मला खूप प्रोजेक्ट्स मिळत आहेत. चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली तरीही तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने लाइमलाइटमध्ये राहू शकता. मला अगदी मनातून वाटते की, त्यांनी अशा काही गोष्टी बोलल्या नसाव्यात. उत्कर्ष शर्मा याने हे देखील सांगितले की, त्याला ओटीटीच्या देखील बऱ्याच आॅफर येत आहेत.