मुंबई : बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन हा कायमच चर्चेत असतो. वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, वरुण धवन याच्या चित्रपटाला काही विशेष धमाका करण्यात यश मिळत नाहीये. वरुण धवन याची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बवाल चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांनी काम केले. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दोघे दिसले. मात्र, चित्रपटाला काही विशेष धमाका करण्यात यश मिळाले नाही.
नुकताच वरुण धवन याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. वरुण धवन याचा हा फोटो पाहून त्याचे चाहते हे चिंतेमध्ये आल्याचे बघायला मिळतंय. वरुण धवन याच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे बघायला मिळतंय. वरुण धवन याला शूटिंगदरम्यान ही दुखापत झालीये. वरुण धवन याचा पाय चांगलाच सूजलेला दिसतोय. हा फोटो पाहून चाहते हैराण झालेत.
वरुण धवन याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने आपला पाय हा खुर्चीवर ठेवलाय. त्याच्या पायाला जास्त सूज असल्याचे बघायला मिळतंय. वरुण धवन याने हा फोटोसोबत रडण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. वरुण धवन याने हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्याचे बघायला मिळत आहे.
वरुण धवन हा सध्या त्याच्या वीडी 18 चित्रपटामध्ये बिझी आहे. वरुण धवन हा वीडी 18 ची शूटिंग करत असतानाच त्याला ही दुखापत झालीये. वीडी 18 या चित्रपटाकडून वरुण धवन याला मोठ्या अपेक्षा आहेत. काही दिवसांपासून वरुण धवन याच्या चित्रपटांना धमाका करण्यात यश मिळताना दिसत नाहीये. एका मागून एक चित्रपट त्याची फ्लाॅप जात आहेत.
वरुण धवन याचा वीडी 18 हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शेवटी वरुण धवन हा बवाल या चित्रपटामध्ये दिसला होता. वरुण धवन याला यापूर्वी देखील एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी पायाला मोठी दुखापत झाली होती. त्यावेळी देखील अभिनेत्याने अशाच प्रकारची फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.