मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) नेहमीच चर्चेत असतो. सध्या वरुन त्याचा आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, या चित्रपटाचे शूटिंग संपले की, वरुण एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. वरुण दिग्दर्शक श्रीराम राघवन (Sriram Raghavan) सोबत काम करणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये श्रीराम राघवन यांनी त्यांच्या आगामी ‘इक्कीस’ (Ekkis) चित्रपटाबद्दल सांगितले या चित्रपटात वरुण धवन आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाचे शूटिंग संपताच वरुण धवन या चित्रपटाची तयारी सुरू करणार आहे. (Actor Varun Dhawan will soon be shooting for his upcoming film Ekkis)
वरुणला ‘इक्कीस’ चित्रपटासाठी बरेच वजन कमी करावे लागणार आहे. वरुण धवन मे महिन्यापासूनच या चित्रपटाची तयारी सुरू करणार आहे. श्रीराम राघवन म्हणाले की, आम्ही चित्रपटासाठी अधिकाधिक तयारी करत आहोत. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन काम सुरू आहे. आम्हाला सप्टेंबरमध्येच चित्रपटाचे शूटिंग सुरू करायचं होते आणि आतापर्यंत चित्रपट पूर्ण झाला असता. पण लॉकडाऊनने हे शक्य झाले नाही. वरुण धवनला या चित्रपटासाठी आर्मी ऑफिसरचे प्रशिक्षणही घ्यावे लागणार आहे. त्याला काही दिवस एनडीएमध्ये घालवायचे आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल आणि जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण होईल.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरुण धवन यांचा चित्रपट ‘Coolie No. 1’ हा 25 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ज्यादिवशी प्रदर्शित झाला होता. तेंव्हा सुशांतच्या चाहत्यांनी सारावर निशाणा साधण्यास होता. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच सुशांतच्या चाहत्यांनी ‘डिसलाईक’ करण्यासाठीची मोहीम सुरू केली होती. सुशांतच्या चाहत्यांते म्हणणे होते की, तिचे सुशांतच्या केसमध्ये नाव आले आहे, त्यामध्ये तिची चाैकशी देखील सुरू आहे मग तिचा चित्रपट कसा प्रदर्शित होऊ शकतो.
संबंधित बातम्या :
Hacked | ईशा देओलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक, चाहत्यांना दिला ‘हा’ संदेश!
Big ComeBack | बाॅलिवूडचे ‘हे’ कलाकार करणार 2021 मध्ये पुनरागमन…
(Actor Varun Dhawan will soon be shooting for his upcoming film Ekkis)